Rohit Sharma Visit Siddhivinayak Temple : गणपती बाप्पा मोरया! रोहित शर्मा अन् जय शाह टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायकाच्या चरणी
Rohit Sharma and Jay Shah Visit Siddhivinayak Temple : भारताच्या ऐतिहासिक टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मा आणि जय शाह सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले.
Rohit Sharma and Jay Shah Visit Siddhivinayak Temple : भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि बीसीसीआय सचिव जय शाह हे सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचले आहेत. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. जय शाह आणि रोहितने भारताने जिंकलेली टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफीही सिद्धिविनायकाच्या चरणी नेली आहे. विशेष म्हणजे या ट्रॉफीला पुष्पहार घालून पूजनही करण्यात आले.
Captain Rohit Sharma & Jay Shah with the T20 WC Trophy at the Siddhivinayak Temple. ❤️ 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2024
- Picture of the Day. pic.twitter.com/IGnZQMOrWn
29 जून रोजी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला आणि इतिहासात दुसऱ्यांदा क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. त्या ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनेही टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दुसऱ्याच दिवशी रवींद्र जडेजानेही या फॉरमॅटला अलविदा केला.
Indian skipper Rohit Sharma and BCCI secretary Jay Shah visited the Shree Siddhivinayak Ganapati Temple in Mumbai with the T20 World Cup 2024 trophy.
— CricTracker (@Cricketracker) August 21, 2024
📸: siddhivinayakonline/Instagram pic.twitter.com/vnRcjySxEZ
रोहित आणि कंपनीसमोर मोठे आव्हान
पुढील काही महिने भारतीय संघासाठी खूप व्यस्त असणार आहेत. टीम इंडियाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर भारत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचे यजमानपद भूषवणार आहे. सध्या बहुप्रतिक्षित सामना बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पुढील वर्षाची सुरुवातही टीम इंडियासाठी सुखकर होणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताला इंग्लंडचे यजमानपद भूषवायचे आहे.