Rishabh Pant : ऋषभ पंत बनला मिर्झापुरमधील 'मुन्ना भैय्या', खास डायलॉगसह शेअर केला फोटो
Rishabh Pant Photo : सध्या भारतीय क्रिकेटमध्ये तिन्ही क्रिकेट प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी जर कोणाची असेल, तर ती पंतची असून त्याची सर्वत्र चांगलीच हवा असल्याचं दिसत आहे.
Rishabh Pant Photo : इंग्लंडविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या दोन्ही मालिकेमध्ये भारताने (India vs England) दमदार विजय मिळवला. दोन्ही मालिका 2-1 च्या फरकाने भारताने जिंकल्या. यावेळी भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) उत्तम कामगिरी केली. त्यानंतर आतापर्यंत पंतची सर्वत्र चर्चा असून आता आणखी एका फोटोमुळे पंत पुन्हा चर्चेत आला आहे. तर हा फोटो म्हणजे पंतने स्वत:च्या सोशल मीडियावर टाकलेला त्याचाच एक कॅज्युवल लूकमधील फोटो आहे. पण फोटो चर्चेत येण्यामागे कारण आहे त्याचं कॅप्शन.
पंतने यावेळी कॅप्शनमध्ये प्रसिद्ध वेबसिरीज मिर्झापूरमधील एक खास डायलॉग शेअर केला आहे. हा या वेब सिरीजमधील फेमस पात्र मुन्ना भैय्या याचा डायलॉग आहे. ''इथे आम्ही एक नियम अॅड करतो, तो म्हणजे मिर्झापुरच्या गादीवर बसणारा कधीही नियम बदलू शकतो.'' असा हा डॉयलॉग असून यामुळे पंतवर मुन्नाभैय्याचं फिव्हर चढल्याचं दिसून येत आहे.
Aur hum ek naya niyam add kar rahe hain, Mirzapur ki gaddi pe baithne wala kabhi bhi niyam badal sakta hai – Munna Bhaiya. 😅#RP17 pic.twitter.com/kSpyG6B4yk
— Rishabh Pant (@RishabhPant17) July 19, 2022
पंतचीच तिन्ही फॉर्मेटमध्ये हवा
मागील वर्षी 2020 पासूनच ऋषभ पंतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. याशिवाय एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांतही पंतची कामगिरी तुफान होताना दिसत आहे. यंदाच्या वर्षात ऋषभ पंतने 23 सामन्यातील 26 डावात 988 रन केले आहेत. ऋषभ पंतची फलंदाजीतील सरासरी 44.90 टक्के इतकी असून त्यांचा स्ट्राईक रेट 98.21 इतका आहे. इंग्लंड दौऱ्यावर ऋषभ पंतने दोन शतकं लगावली आहेत. यावेळी पंतने 146 धावांची एक दमदार खेळी देखील खेळला. या शतकांमुळे ऋषभ पंतने यंदा 2022 या वर्षात तीन शतकं आणि 6 अर्धशतकं लगावली आहेत. विशेष म्हणजे सर्व शतकं ही अत्यंत महत्त्वाच्या सामन्यांमध्ये लगावल्याने पंतवर कौतुकाचा आणखी वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा-
- Hardik Pandya : मर्यादीत षटकांमध्ये हार्दिक भारताचा 'स्टार खेळाडू,' माजी भारतीय क्रिकेटपटूकडून पांड्याचं कौतुक
- Sreesanth about Virat : 'विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली मी खेळलो असतो तर संघाने विश्वचषक जिकला असता,' माजी गोलंदाज श्रीशांतचा दावा
- Commonwealth Games 2022: विश्वचषकात महिला हॉकी संघाचं खराब प्रदर्शन, कॉमनवेल्थ गेम्समध्ये दमदार कामगिरीची अपेक्षा