Ind vs Ban Video: "रोहित भाईने 1 तास दिला होता, नाय तर..." लंच ब्रेकमध्ये ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं? ऋषभ पंतचा खुलासा
चेन्नईत बांगलादेशविरुद्धचा कसोटी सामना चार दिवसांत जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
India vs Bangladesh Test : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने उत्कृष्ट कामगिरी करत कसोटी क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केले. 20 महिन्यांहून अधिक काळानंतर तो रेड-बॉल फॉरमॅटमध्ये परतला.
ऋषभ पंतने पहिल्या डावात यशस्वी जैस्वालसोबत भागीदारी करत भारताचा डाव सावरला. त्याने 52 चेंडूत 39 धावा केल्या. यानंतर त्याने दुसऱ्या डावात 109 (128) धावांची शानदार खेळी केली. या विजयानंतर ऋषभ पंतने तिसऱ्या दिवशी लंच ब्रेक दरम्यान कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला यांचा खुलासा केला आहे.
रोहित काय म्हणाला?
पंतने ब्रॉडकास्टरला सांगितले की, "जेव्हा आम्ही लंचसाठी गेलो होतो, तेव्हा डाव घोषित करण्याबाबत चर्चा झाली होती. रोहित भाई म्हणाला की तो एक तास खेळून बघू किती धावा करायच्या आहेत. यानंतर माझ्या मनात आले की मी थोड्या वेगाने धावा करू... काय माहीत मी 150 धावा करू शकतो.
Rishabh pant bodied all haters who trolled Rohit sharma for not giving enough time to kl Rahul at the crease
— Gillfied⁷⁷ (@Gill_era7) September 22, 2024
pic.twitter.com/MVPiWkhr4w
भारताचा मोठा विजय
बांगलादेशविरुद्ध भारताने जबरदस्त कामगिरी केली. पाकिस्तानवर 2-0 असा ऐतिहासिक क्लीन स्वीप केल्यानंतर येथे आलेल्या बांगलादेश संघाला भारताने रोखले. प्रथम फलंदाजी करताना भारताने अश्विनचे शानदार शतक आणि यशस्वी जैस्वाल-रवींद्र जडेजाच्या अर्धशतकांच्या जोरावर 376 धावा केल्या. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय गोलंदाजीने बांगलादेशला 149 धावांवर ऑलआऊट केले. बुमराहने 4 विकेट घेतल्या.
भारताला पहिल्या डावात 227 धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि शुभमन गिलच्या शतकांमुळे भारताला 514 धावांची आघाडी मिळाली. येथून अश्विनने सहा विकेट घेतल्या आणि भारताने सामना जिंकला.
हे ही वाचा -
1312 विकेट्स अन् 10 हजारांहून अधिक धावा; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात घातक जोडी कोणती?