Rishabh Pant : रिषभ पंतनं इंग्लंडमध्ये 24 षटकार मारत इतिहास रचला, बर्मिंघम कसोटीत इंग्लंडच्या कॅप्टनला धक्का
Rishabh Pant : भारताचा स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतनं इंग्लंडच्या विरुद्ध दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक केलं. यावेळी त्यानं बेन स्टोक्सला धक्का दिला.

बर्मिंघम : रिषभ पंतनं इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी केली आहे. रिषभ पंतनं बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर इंग्लंड विरुद्ध 65 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्यानं 58 बॉलमध्ये 65 धावा केल्या. त्यानं 8 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. रिषभ पंतचं हे कसोटीमधील 16 वं अर्धशतक आहे. रिषभ पंतनं आणखी एक विक्रम केला आहे ज्यानं इंग्लंडच्या कॅप्टनला धक्का बसला आहे.
रिषभ पंतनं विदेश दौऱ्यावर एखाद्या देशाविरुद्ध सर्वाधिक षटकार कसोटी क्रिकेटमध्ये मारण्याचा विक्रम केला आहे. रिषभ पनंतनं इग्लंडमध्ये 24 षटकार मारले आहेत. स्टोक्सनं दक्षिण आफ्रिकेत त्यांच्या विरुद्ध 21 षटकार मारले आहेत. रिषभ पंतनं आजच्या खेळीत 3 षटकार मारले. रिषभ पंतनं आज हा विक्रम आपल्या नावावर केला. पंत आणि स्टोक्स नंतर विदेशात एखाद्या देशाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सर विवियन रिचर्डस यांच्या नावावर आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये 16 षटकार मारले होते.
पंतनं आणखी एक विक्रम नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन हजार धावा करणारा रिषभ पंत पहिला आशियाई विकेटकीपर ठरला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड , न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया ला SENA देश म्हटलं जातं. SENA देशांविरुद्ध कसोटीत सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या आशियाई विकेटकीपरच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 52 डावांमध्ये 50 पेक्षा अधिक धावा 12 वेळा केल्या आहेत. रिषभ पंतच्या पुढं महेंद्रसिंह धोनी असून त्याच्या नावावर 60 डावांमध्ये 13 वेळा अशी कामगिरी केली आहे.
दरम्यान, दुसऱ्या कसोटीचा विचार केला असता भारतानं 76 व्या ओव्हरपर्यंत 4 बाद 367 धावा केल्या आहेत. भारताकडे पहिल्या डावातील 180 धावांची आघाडी आहे. हे दोन्ही मिळून भारताकडे 547 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात भारताकडून केएल. राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतकं केली आहेत. तर, कॅप्टन शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावा केल्या तर दुसऱ्या डावात शतक केलं आहे.
कॅप्टन गिलचं शतक
भारतानं दुसऱ्या कसोटीवर पूर्णपणे वर्चस्व मिळवलं आहे. भारताची आघाडी दुसऱ्याडावातील धावसंख्या मिळून 500 च्या वर गेली आहे. आता शुभमन गिलनं पहिल्या डावात 269 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात 143 धावा केल्या आहेत. दोन्हींची बेरीज केल्यास दोन्ही डावांची धावसंख्या 400 च्या वर जाते. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा शुभमन गिल पाचवा खेळाडू ठरला आहे.





















