Rivaba Jadeja News : परदेशी दौऱ्यावर टीम इंडियाचे सर्व खेळाडू व्यसन करतात, पण माझा नवरा...; रवींद्र जडेजाच्या पत्नीचे खळबळजनक विधान, नेमकं काय म्हणाली?
Rivaba Jadeja On Team India Players : रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तर विधानसभा क्षेत्रातील आमदार रिवाबा जडेजा सतत चर्चेत असते.

Rivaba Jadeja Controversial Statement On Team India Players : राजकारणात प्रवेश केल्यापासून क्रिकेटर रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी आणि जामनगर उत्तर विधानसभा क्षेत्रातील आमदार रिवाबा जडेजा (Rivaba Jadeja) सतत चर्चेत असते. अलीकडेच गुजरातच्या शिक्षणमंत्रीपदी रिवाबा जडेजाची नियुक्ती झाली. याचदरम्यान तिचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर मोठी चर्चा सुरू आहे. एबीपी माझाच्या पडताळणीत मात्र समोर आले की रिवाबाने हे वक्तव्य जवळपास महिनाभरापूर्वी एका कार्यक्रमात केले होते, आणि तिचा व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल केला जात आहे.
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा नेमकं काय म्हणाली?
जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार रिवाबा जडेजा दीपसिंहजी ध्रोळ भयत राजपूत वसतिगृहातील विद्या सन्मान सोहळ्याला जामनगरमध्ये उपस्थित होत्या. भाषणादरम्यान तिने मुलगा आणि मुलगी यांच्यातील समानता, मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवण्याची गरज आणि मुलींइतकेच मुलांनाही प्रश्न विचारण्याची गरज यावर भर दिला.
व्यसन मुक्त राहण्याचे आवाहन करताना रिवाबाने तिचा पती रवींद्र जडेजाचे कौतुक केले. ती म्हणाली की, “माझे पती लंडन, दुबई, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी खेळण्यासाठी जातात, पण त्यांनी आजवर कोणते व्यसन केले नाही किंवा हातही लावलेला नाही. मात्र बाकीच्या टीममधील खेळाडू भरपूर व्यसन करतात.”
रिवाबा पुढे म्हणाल्या की, “माझ्या पतीला कोणी रोखत नाही, ते हवं तर चुकीच्या गोष्टी करू शकतात. पण ते तसे करत नाहीत, कारण त्यांना आपली जबाबदारी माहिती आहे.” या जुन्या व्हिडिओमुळे आता सोशल मीडियावर रिवाबा जडेजावर टीकेची झोड उठली आहे. पण, या प्रकरणावर तिने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
"मेरे पति (रवींद्र जडेजा , क्रिकेटर)को लंदन , दुबई, ऑस्ट्रेलिया जैसे अनेकों देशों में खेलने के लिए जाना होता है फिर भी आज दिन तक उन्होंने कभी व्यसन नहीं किया क्योंकि वो अपनी जवाबदारी को समझते हैं @Rivaba4BJP जी , शिक्षा मंत्री गुजरात सरकार #Rivabajadeja #ravindrajadeja pic.twitter.com/OyuiPFPvVa
— राणसिंह राजपुरोहित (@ransinghBJP) December 10, 2025
क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ
रिवाबा जडेजाच्या विधानानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला. रिवाबा एखाद्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत येणे हे नवीन नाही, पण यावेळी विषय थेट क्रिकेटपटूंशी संबंधित असल्याने प्रकरण आणखी मोठे झाले आहे.
IPL 2026 मध्ये जडेजा नव्या संघात
रिवाबाच्या वक्तव्याच्या दरम्यान क्रिकेटमधून आणखी एक मोठी बातमी समोर आली. आयपीएल 2026 मध्ये रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सच्या जर्सीत खेळताना दिसणार आहेत. गेल्या काही हंगामापासून चेन्नई सुपर किंग्सचा अविभाज्य भाग असलेल्या जडेजाला एका मोठ्या ट्रेड डीलमध्ये राजस्थानने आपल्या संघात सामील केले. विशेष म्हणजे, जडेजाने 2008 मधील पहिल्या आयपीएल हंगामात पदार्पणदेखील राजस्थान रॉयल्सकडूनच केले होते. म्हणजेच ते पुन्हा एकदा आपल्या पहिल्या फ्रँचायझीकडे पुनरागमन करत आहेत.
हे ही वाचा -
ICC रँकिंगमध्ये टॉपवर, पण BCCI रोहित अन् विराटचे पाय खेचणार; शुभमनला पुन्हा लॉटरी?, नेमकं काय घडतंय?





















