Axar Patel and Ravindra Jadeja : न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) क्रिकेट मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) नुकतीच घोषणा झाली. सोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संघाची घोषणा झाली आहे. दरम्यान यावेळी न्यूझीलंडविरुद्ध अक्षर पटेल (Axar Patel) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दोघेही संघात नाहीत, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोघांनाही संघात संधी मिळाली आहे. अशामध्ये दोघांची संघातील जबाबदारी सारखीच असल्यानं नेमकी अंतिम 11 मध्ये कोणाला संधी मिळणार हा प्रश्न निर्माणझाला आहे. अक्षरच्या तुलनेत जाडेजा अनुभवी असला तरी अलीकडच्या काळात अक्षरच्या कामगिरीनं त्याला संघाबाहेर करणं निवडसमितीसाठी अवघड झालं आहे.


रवींद्र जाडेजाने 31 ऑगस्ट रोजी आशिया कपमध्ये हाँगकाँगविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. गेल्या चार महिन्यांपासून तो संघापासून दूर आहे. अशा स्थितीत जाडेजाला संघात स्थान मिळालं असलं तरी त्याच्या दुखापतीवर त्याला खेळवणं अवंलंबून असल्याचं बीसीसीआयनं म्हटलं आहे. तरसंच तो  संघात येताच चांगली कामगिरी करेल हे निश्चित नाही. त्याच्या अनुपस्थितीत अक्षर पटेलने टीम इंडियासाठी सर्व फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 52 धावा करण्यासोबतच त्याने 8 विकेट्स घेतल्या होत्या. याशिवाय एकदिवसीय मालिकेत एका अर्धशतकासह 76 धावा करण्यासोबतच त्याने 2 बळीही घेतले. श्रीलंकेविरुद्धही अक्षरची चमकदार कामगिरी कायम आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही त्याने 31, 65 आणि 21 धावा देत तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, अक्षरने श्रीलंकेविद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 2 सामन्यांमध्ये 30 धावा करण्यासोबतच एक विकेटही घेतली आहे. त्यामुळे अक्षर आणि जाडेजा यांच्यात अंतिम 11 मध्ये आणि भविष्यातील सामन्यांत कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.






ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीमालिकेसाठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव


हे देखील वाचा-