Veda Krishnamurthy Marriage Bengaluru : भारतीय महिला क्रिकेटपटूने (Indian Cricketer) गुपचूप लग्न केलं आहे. भारतीय महिला संघाची खेळाडू वेदा कृष्णमूर्ति (Veda Krishnamurthy) गुरुवारी विवाहबंधनात अडकली आहे. वेदा कृष्णमूर्ति कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होयसालासोबत (Arjun Hoysala) लग्नबंधनात अडकली आहे. वेदाने सोशल मीडियावर फोटोसोबत खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही खूशखबर दिली आहे. यानंतर वेदाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिचे अभिनंदन केले आहे. यासोबतच अनेक सेलिब्रिटींनीही शुभेच्छा दिल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे वेदाच्या दिवंगत आईच्या वाढदिवसाच्या दिवशी या दोघांनी रेशीमगाठ लग्नगाठ बांधली आहे.
वेदा कृष्णमूर्तिने तिची दिवंगत आई चेलुवांबा देवी (Cheluvamaba Devi) यांच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. वेदाच्या आईचे 2021 मध्ये कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांनंतर तिची बहीण वत्सला शिवकुमार हिचेही कोरोनामुळे निधन झाले.
इंस्टाग्रामवर शेअर केली खास पोस्ट
इंस्टाग्रामवर वेदा कृष्णमूर्तिने तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. तिने पोस्ट शेअर करत लिहिले आहे, 'आई हे तुझ्यासाठी आहे. तुझा वाढदिवस नेहमीच खास असेल.' वेदाने तिच्या दिवंगत बहिणीसाठी म्हटलं आहे की 'लव्ह यू अक्का'.
वेदा आणि अर्जुनची कोर्ट मॅरेज
वेद आणि अर्जुन यांनी बेंगळुरू येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात अत्यंत साध्या पद्धतीने कोर्ट मॅरेज करत लग्नाचे विधी पूर्ण केले. यावेळी हे दोघेही अत्यंत साध्या कपड्यांमध्ये दिसले. कुटुंबातील काही सदस्य आणि जवळच्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या