Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी रात्री उशिरा न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी T20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा केली. दरम्यान यावेळी बऱ्याच काळानंतर भारताचा स्टार युवा फलंदाज पृथ्वी शॉचे (Prithvi Shaw) टीम इंडियात पुनरागमन झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याला संधी मिळाली असून यासाठी कारण ठरली त्याने नुकतीच केलेली  रणजी ट्रॉफीमधी रेकॉर्डब्रे 379 धावांची विक्रमी खेळी. मागील काही दिवस देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या शॉच्या या खेळीनंतर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे दरवाजे लगेचच उघडले आहेत.

पृथ्वी 26 महिन्यांनंतर संघात परतला

पृथ्वी शॉ 26 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात परतला आहे. या काळात पृथ्वी शॉने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली पण त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळत नव्हते. मात्र, रणजी ट्रॉफीमध्ये शॉने आसामविरुद्ध 379 धावांची विक्रमी खेळी खेळली आणि निवडकर्त्यांना टीम इंडियामध्ये स्थान देण्यास भाग पाडले. रणजी ट्रॉफीपूर्वी पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही सर्वाधिक धावा केल्या होत्या.

पृथवी शॉ व्यतिरिक्त, 29 वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा राखीव यष्टीरक्षक असेल. याआधी, संजू सॅमसनला दुखापत झाल्यानंतर त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संधी मिळाली होती, मात्र जितेशला अजून टीम इंडियासाठी पदार्पण करायचे आहे. अशा परिस्थितीत जितेश न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया - हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.

भारत वि. न्यूझीलंड T20 मालिका वेळापत्रक

सामना संघ दिनांक ठिकाण
पहिला T20 सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड जानेवारी 27 रांची
दुसरा T20 सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड जानेवारी 29 लखनौ
तिसरा T20 सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड फेब्रुवारी 01 अहमदाबाद

हे देखील वाचा-