Indian Squad: ऑस्ट्रेलियाविरोधात मायदेशात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 9 फेब्रुवारी रोजी पहिला कसोटी सामना होणार आहे. या संघ निवडीतील मधील सर्वात मोठी बाब म्हणजे, रविंद्र जाडेजा, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव होय.. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सूर्यकुमार यादल आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. तसेच दुखापतीनंतर रविंद्र जाडेजा संघात पुनरागमन करतोय.
रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. तर केएल राहुल उपकर्णधार असेल. त्याशिवाय पंतच्या अनुपस्थितीत केएस भरत याला विकेटकिपर म्हणून स्थान देण्यात आलेय. ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी रविंद्र जाडेजाला संधी देण्यात आली आहे. पण तो फिटनेस टेस्ट पास केली तरच संघाचा भाग असेल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलेय. जसप्रीत बुमराह अद्याप दुखापतीतून सावरला नसल्यामुळे त्याला संघात स्थान दिलेलं नाही.
ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ (India’s squad for first 2 Tests vs Australia) - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
| सामना | तारीख | ठिकाण |
| पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
| दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
| तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
| चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
| पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
| दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
| तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |
आणखी वाचा:IND vs NZ: टी20 मध्ये हार्दिक पुन्हा कर्णधार, रोहित-विराटला स्थान नाही, पृथ्वी शॉला संधी