एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC World Cup 2019 : श्रीलंकेचा बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द
श्रीलंकेला लागोपाठ दोन सामन्यांमध्ये केवळ एका गुणावर समाधान मानावं लागलं आहे.
लंडन : इंग्लंडमधल्या विश्वचषकात पावसानं श्रीलंकेला पुन्हा इंगा दाखवला आहे. श्रीलंकेचा बांगलादेशविरुद्धचा सामना आज पावसामुळं रद्द करावा लागला. श्रीलंका बांगलादेश सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे.
विश्वचषक स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे सामना रद्द होण्याची वेळ आली आहे. श्रीलंकेचा पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द करण्याची वेळ आली होती. त्यामुळं श्रीलंकेला लागोपाठ दोन सामन्यांमध्ये केवळ एका गुणावर समाधान मानावं लागलं आहे.
योगायोगाची गोष्ट म्हणजे श्रीलंकेच्या पाकिस्तान आणि बांगलादेश संघांविरुद्धच्या सामन्यात पावसामुळं एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळं श्रीलंकेच्या खात्यात चार सामन्यांमध्ये चार गुण झाले आहेत. तर बांगलादेशचे चार सामन्यांमधून तीनचं गुणं झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement