Samit Dravid Six : राहुल द्रविडचा पोरगाही क्रिकेटमध्ये करणार धमाका? डिव्हिलियर्ससारख्या स्फोटक शैली ठोकतोय षटकार - Video
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड याने क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले.
Rahul Dravid son Samit Dravid hit six : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड याने क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केले. समितने कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराज ट्रॉफी टी-20 क्रिकेटमधील आपल्या पदार्पणाच्या सामन्यात एक जबरदस्त षटकार मारून लोकांची मने जिंकली. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
फलंदाजीची शैली वडिलांपेक्षा वेगळी
राहुल द्रविडला भारतीय क्रिकेटची भिंत म्हणून ओळखले जाते. ज्याच्याकडे उत्कृष्ट शॉट्स असायचे. द्रविडने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात 10-10 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. पण द्रविडचा मुलगा समित त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे.
वेगळा म्हणजे आक्रमक फलंदाज आहे. महाराजा चषकात समितने आपली आक्रमकता दाखवली. समितने सहज एक गगनचुंबी षटकार मारला. जणू काही हा शॉट समितने नाही तर एबी डिव्हिलियर्सने मारला अस वाटत होत. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
ದ್ರಾವಿಡ್ ಸರ್ ಮಗ ಗುರು ಇವ್ರು..🤯🔥
— Star Sports Kannada (@StarSportsKan) August 16, 2024
ಈ ಸಿಕ್ಸ್ ಗೆ ಒಂದು ಚಪ್ಪಾಳೆ ಬರ್ಲೇಬೇಕು..👏👌
📺 ನೋಡಿರಿ Maharaja Trophy KSCA T20 | ಬೆಂಗಳೂರು vs ಮೈಸೂರು | LIVE NOW #StarSportsKannada ದಲ್ಲಿ#MaharajaTrophyOnStar@maharaja_t20 pic.twitter.com/ROsXMQhtwO
समित वडिलांप्रमाणे होणार का यशस्वी?
क्रिकेटरमध्ये जेवढे यश दिग्गज खेळाडूंना मिळाले आहे तेवढे क्वचितच त्यांच्या मुलांना मिळाले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोहन गावसकर. रोहन हा सुनील गावसकर यांचा मुलगा आहे. त्याने भारतीय संघासाठी नक्कीच पदार्पण केले. पण अवघ्या काही सामन्यांनंतर त्याची कारकीर्द संपुष्टात आली. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप दिवसांपासून मेहनत घेत आहे, पण राष्ट्रीय संघ सोडा, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्समध्येही त्याला आपले स्थान पक्के करता आलेले नाही. मुंबई रणजी संघात स्थान मिळवू न शकल्यामुळे तो गोव्यासाठी रणजी खेळतो.
जर आपण समितबद्दल बोललो तर, तो फक्त 19 वर्षांचा आहे आणि आतापर्यंत त्याची कामगिरी चांगली आहे. राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाल्यावर तो कशी कामगिरी करतो आणि त्याची कारकीर्द किती काळ टिकते हे पाहायचे आहे.
संबंधित बातमी :
MS Dhoni IPL 2025 : मोठा ट्विस्ट! MS धोनीबद्दल आम्ही असे काही बोललोच नाही... CEOचा मोठा खुलासा
Ishan Kishan : शतक ठोकलं तरी फायदा नाही...?; BCCI ने इशान किशनला दिला कडक शब्दात इशारा