एक्स्प्लोर

Raghu Sharma MI vs LSG IPL 2026: राधे राधेने सुरुवात, जय श्री रामने शेवट...; रघूच्या चिठ्ठीत काय लिहिलेलं?, सूर्यकुमारसह सगळे वाचत बसले!

Raghu Sharma MI vs LSG IPL 2026: मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळणारा फिरकीपटू गोलंदाज रघू शर्माने सगळ्याचं लक्ष वेधलं.

Raghu Sharma MI vs LSG IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (MI vs LSG) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने जोरदार कमबॅक करत 6 विकेट्सने विजय मिळवला.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून खेळणारा फिरकीपटू गोलंदाज रघू शर्माने (Raghu Sharma) सगळ्याचं लक्ष वेधलं. मुंबई इंडियन्सने या हंगामात अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. असाच एक खेळाडू म्हणजे लेग-स्पिनर राघू शर्मा, ज्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या मागील सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आज वानखेडे स्टेडियमवर त्याने लखनौविरुद्ध सामना खेळला आणि आपली पहिली विकेट मिळवली. आपली पहिली विकेट घेतल्यानंतर, राघूने आपल्या खिशातून कागदाची एक चिठ्ठी बाहेर काढली, ज्यावर एक संदेश लिहिलेला होता. त्याचा हा संदेश आता सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. (Raghu Sharma MI vs LSG IPL 2026)

मैदानात नेमकं काय घडलं? (Raghu Sharma MI vs LSG IPL 2026)

लखनौकडून अक्षत रघुवंशीने मुंबईविरुद्ध पर्दापण केले. पर्दापणाच्या या पहिल्या सामन्यात अक्षत रघुवंशीला 7 चेंडूत 11 धावा केल्या. मात्र अक्षतला मोठी खेळी खेळता आली नाही. रघू शर्माने अक्षतला आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले आणि आयपीएलमधील पहिली विकेट पटकावली. 13 षटकाच्या अगदी पहिल्याच चेंडूवर अक्षतला झेलबाद करून राघवने आपली पहिली आयपीएल विकेट मिळवली. त्यानंतर, विकेटचा आनंद साजरा करत असताना, राघूने आपल्या खिशातून तो संदेश लिहिलेली कागदाची चिठ्ठी बाहेर काढली. त्या संदेशाचा शेवट "जय श्री राम" या शब्दांनी झाला होता. रघूने काढलेल्या या चिठ्ठीमध्ये नेमकं काय लिहिलंय हे पाहण्यासाठी सूर्यकुमार यादवही रघूच्या जवळ गेला आणि चिठ्ठी वाचत बसला. 

रघूने चिठ्ठीत काय लिहिलं होतं? (Raghu Sharma Note MI vs LSG IPL 2026)

विकेट पटकवल्यानंतर रघू खिशातून एक चिठ्ठी काढली. यामध्ये "राधे-राधे. आज गुरुदेवांच्या कृपेने, 15 वर्षांचा एक वेदनादायी प्रवास संपुष्टात आला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे आभार. जय श्री राम...असं लिहिलं होतं. 

मुंबई आणि लखनौचा सामना कसा राहिला? (MI vs LSG IPL 2026)

लखनौ सुपर जायंटसनं प्रथम फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रेयान रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या इतिहासातील सर्वात मोठी पाचवी भागीदारी होती. रेयान रिकल्टन 83 धावांवर बाद झाला.  तर, रोहित शर्मानं देखील 84 धावा केल्या. रिकल्टन यानं 6 चौकार आणि 8 षटकार मारले. तर, रोहित शर्मानं 6 चौकार आणि 7 षटकार मारले. एम. सिद्धार्थनं रोहित शर्माला बाद केलं. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा त्यांना 6 ओव्हरमध्ये 52 धावा करायच्या होत्या. सूर्यकुमार यादव देखील मोठी धावसंख्या करु शकला नाही. नमन धीर यानं मुंबईला विजयापर्यंत पोहोचवलं. मुंबईनं 18.4  ओव्हरमध्ये 4 बाद 229 धावा केल्या. लखनौ विरुद्ध झालेला विजय मुंबईसाठी तिसरा विजय ठरला. 

संबंधित बातमी:

Rohit Sharma MI vs LSG IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर नीता अंबानी लगेच रोहित शर्माकडे पोहोचल्या, नेमकं काय केलं?, VIDEO

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Eng vs Pak 1st Test : बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
IND vs SL 1st Test DAY-5 Live : गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
IND vs SL 1st Test : टीम इंडियाच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावला जाणार, पाचव्या दिवशी सामना होणार रद्द? श्रीलंकेतून मोठी अपडेट समोर
टीम इंडियाच्या तोंडापर्यंत आलेला विजयाचा घास हिसकावला जाणार, पाचव्या दिवशी सामना होणार रद्द? श्रीलंकेतून मोठी अपडेट समोर
Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget