(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rachin Ravindra : रचिनच्या नावाची आणि वर्ल्डकपच्या कामगिरीची अख्ख्या जगात चर्चा, पण आता वडिल म्हणत आहेत दुसरंच काही!
आतापर्यंत असे बोलले जात होते की वडिलांनी रचिन रवींद्र हे नाव माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर ठेवले आहे. मात्र आता रचिन रवींद्रच्या वडिलांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Rachin Ravindra : विश्वचषकात न्यूझीलंडचा अष्टपैलू रचिन रवींद्रची बॅट अक्षरश: तळपत आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रचिन रवींद्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. रचिन रवींद्रने आतापर्यंत 9 सामन्यात 70.62 च्या सरासरीने 565 धावा केल्या आहेत. त्याचवेळी रचिन रवींद्रचे नाव चर्चेचा विषय ठरत आहे. आतापर्यंत असे बोलले जात होते की वडिलांनी रचिन रवींद्र हे नाव माजी भारतीय दिग्गज राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावावर ठेवले आहे. मात्र आता रचिन रवींद्रच्या वडिलांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
Rachin Ravindra's father denies naming after Rahul Dravid and Sachin Tendulkar. pic.twitter.com/WBafcptVUM
— CricTracker (@Cricketracker) November 14, 2023
'नावात राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरमध्ये कोणताही संबंध नाही'
रचिन रवींद्रच्या वडिलांनी सांगितले की, रचिनचा जन्म झाला तेव्हा माझ्या पत्नीने नाव सुचवले, नाव ठरवायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. पण राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावांचा संदर्भ असल्याचे आम्हाला अनेक वर्षांनी कळले.त्यामुळे रचिन रवींद्र या नावामागे राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर कनेक्शनचा दावा आतापर्यंत केला जात होता. माझा मुलगा क्रिकेटर होईल किंवा त्याच्याशी संबंधित काही करेल या विचाराने आम्ही नाव ठरवले नाही, असेही वडिलांनी सांगितले.
Rachin Ravindra mesmerised the world with his phenomenal performance at #CWC23, earning him the ICC Men's Player of the Month award 🏅
— ICC (@ICC) November 10, 2023
Details 👉 https://t.co/pht5clrQr5 pic.twitter.com/rRdQZzQEYz
रचिन रवींद्रची क्रिकेट कारकीर्द
रचिन रवींद्रच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर 3 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त या खेळाडूने 21 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. रचिन रवींद्रने 3 कसोटी सामन्यांमध्ये 29.67 च्या स्ट्राइक रेटने आणि 14.6 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. रचिन रवींद्रने 21 एकदिवसीय सामन्यांमध्ये 109.28 च्या स्ट्राइक रेटने आणि 47.12 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने 18 टी-20 सामन्यांमध्ये 117.89 च्या स्ट्राइक रेटने आणि 13.18 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पण या खेळाडूला वर्ल्डकपमधून खरी ओळख मिळाली आहे. रचिन रवींद्र या विश्वचषकात किवी संघासाठी खूप धावा करत आहे. गरज पडेल तेव्हा गोलंदाजीत महत्त्वाचे योगदान देत आहेत.
4 of the 5 would've made it to many prediction lists...
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 9, 2023
The youngest of the lot, however, is leading the charts 🙌
What a tournament for Rachin Ravindra ✨ #CWC23 #NZvSL pic.twitter.com/RPOlZy8LNt
इतर महत्वाच्या बातम्या