R Ashwin On IndiGo Airlines : “मला खात्री आहे की हा स्कॅम...”, आर अश्विनने इंडिगो एअरलाइनबद्दल केला धक्कादायक खुलासा
R Ashwin On IndiGo Airlines : भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने एका अनोख्या घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. ज्याचा सामना इतरही अनेकांनी केला आहे. हे प्रकरण एका विमान कंपनीशी संबंधित आहे....
R Ashwin On IndiGo Airlines : भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने नुकतीच इंडिगो एअरलाइनबद्दल धक्कादायक खुलासा केला. सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर करताना त्यांनी आरोप केला की इंडिगो एअरलाइन्स प्रवाशांनी आधीच बुक केलेल्या सीटकडे दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. अश्विनने एअरलाईनला फटकारले आणि हा एक स्कॅम असल्याचे वर्णन केले.
अश्विनने इंडिगो एअरलाइन्सवर केली टीका
अश्विनने ट्विटरवर लिहिले, "ही समस्या आता इंडिगो एअरलाइन्समध्ये सामान्य होत चालली आहे. माझा अलीकडचा अनुभव खूपच वाईट होता. थर्ड पार्टी बुकिंग प्लॅटफॉर्मवरून बुकिंग केल्यानंतर, एअरलाइनने माझी बुक केलेली सीट दुसऱ्याला दिली. हा स्कॅम आहे की नाही हे माहित नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही, आम्ही पैसे दिले तरी आम्हाला आमची बुक केलेली सीट मिळणार नाही.
This is becoming a regular menace @IndiGo6E ,my recent experience with them through a third party booking platform was terrible, they make you pay and then end up doing whatever they choose to do.
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 26, 2024
Not sure if it’s a scam !!
heyyy who is ever going to pull them up ???
All we… https://t.co/cMTf4fFvKh
हर्षा भोगले यांनीही केली इंडिगो एअरलाइन्सवर टीका
अश्विनची ही तक्रार अशा वेळी आली आहे, जेव्हा प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही काही दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाइन्सवर टीका केली होती. त्यावेळी हर्षा यांनी ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली होती. भोगले यांनी एक प्रसंग सांगितला होता की, एका वृद्ध जोडप्याने त्यांना जास्त चालावे लागू नये म्हणून चौथ्या रांगेत सीट बुक केली होती. त्यांनी आधीच त्या सीटसाठी पैसे दिले होते. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची जागा १९व्या रांगेत बदलण्यात आली. या बदलामुळे वृद्ध व्यक्तीला कॉरिडॉरमधून चालताना खूप त्रास झाला.
Another example of #IndigoFirstPassengerLast. An elderly couple on my flight had paid for seats in row 4 so they wouldn't have to walk much. Without an explanation, #Indigo changed it to seat 19. The gentleman was going to struggle to walk till row 19 in a narrow passage. But who…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) August 24, 2024
खरं तर, हा घोटाळा नेमका आहे तरी काय, हे अद्याप कोणालाही समजलेले नाही. पण या गोष्टीमुळे मनस्ताप मात्र नक्कीच होत आहे.
हे ही वाचा :