IND vs SA 2nd Test : टीम इंडियाने चौथ्या दिवशीच पराभव मान्य केला?; आर.अश्विन संतापला, ऋषभ पंतचा तो फोटो शेअर करत काय काय म्हणाला?
R Ashwin on Body Language Indian Cricketers : गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेनं भारतावर तब्बल 395 धावांची प्रचंड आघाडी घेतली आहे.

R Ashwin on Body Language Indian Cricketers : गुवाहाटीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेनं भारतावर तब्बल 395 धावांची प्रचंड आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियावर मालिका पराभवाचे सावट आणखीन गडद झालं आहे. मात्र माजी क्रिकेटपटू आर. अश्विनला विश्वास आहे की भारतीय फलंदाज दुसऱ्या डावात टीमला पुनरागमन करून देऊ शकतात. पण मैदानावर भारतीय खेळाडूंची बॉडी लँग्वेज मात्र त्याला चिंताजनक वाटली आहे.
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची दणदणीत कामगिरी
दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तब्बल 489 धावांचा डोंगर उभा केला. सेनुरन मुथुसामीचे शतक (109) ठोकले, तर मार्को यानसेनची आक्रमक 93 धावांची खेळी खेळली. भारताची पहिल्या डावातील फील्डिंग आणि उभी राहणारी एनर्जी पाहून अश्विन संतापला.
“खेळाडूंची बॉडी लँग्वेज चिंताजनक....”, आर.अश्विन संतापला
पहिल्या डावात भारत 201 धावांत ऑलआउट झाला. त्यानंतर अश्विन यांनी ऋषभ पंतचा फोटो शेअर करत एक्सवर लिहिलं की, “मनापासून आशा आहे की आपण दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करून सामना परत आपल्या बाजूला खेचू. पण मैदानावरील बॉडी लँग्वेजचे संकेत…” यासोबत त्यांनी तुटलेल्या हृदयाचा इमोजीही पोस्ट केला.
मालिकेत फक्त यशस्वी जैस्वाल लढला अन्...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आतापर्यंतच्या तीनही डावांमध्ये फक्त यशस्वी जैस्वालनेच अर्धशतक (58) झळकावले आहे. पहिला कसोटी सामना कोलकात्यात भारत 3 दिवसांत हरला, तेही फक्त 124 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना. आता गुवाहाटी कसोटी ड्रॉ जरी झाली तरी दक्षिण आफ्रिका मालिका जिंकेल.
400 च्या पार आफ्रिकेची आघाडी
दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात कसलीही जोखीम न घेता खेळत असून त्यांची आघाडी आता 400 धावांवरून पुढे गेली आहे. भारताला फॉलोऑनपासून बचावही करता आला नाही. भारतीय भूमीवरच्या कसोटीत 400 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य शेवटच्या डावात कधीच यशस्वी झालेले नाही.
2-0 क्लीन स्वीपची शक्यता
2 सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेनं 30 धावांनी जिंकला होता. भारताला शेवटच्या डावात 124 धावा करतानाही अपयश आले होते.
आता दुसऱ्या कसोटीतही दक्षिण आफ्रिका जिंकली तर ही मालिका ते 2-0 ने क्लीन स्वीप करतील.
हे ही वाचा -





















