एक्स्प्लोर

PSL 2023 : पाकिस्तान लीगमध्येही पोलार्डचा जलवा, सुपरमॅनप्रमाणे उडी घेत घेतली कॅच

Pakistan Super league : पेशावर झाल्मी आणि मुलतान सुलतान संघाविरुद्धच्या मुलतान सुलतानच्या कायरन पोलार्ड याने एक अप्रतिम झेल टीपला.

PSL 2023 : पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2023 या यंदाच्या हंगामातील 27 वा सामना पेशावर झाल्मी आणि मुलतान सुलतान यांच्यात रावळपिंडीच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात पेशावर झाल्मीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 242 धावा केल्या, ज्यात कर्णधार बाबर आझमने 73 तर सैम अयुबने 58 धावा केल्या. पेशावर संघाने त्यांच्या डावाच्या शेवटच्या षटकात एकूण 24 धावा केल्या. त्याचवेळी या षटकाच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारला असता, स्टार अष्टपैलू कायरन पोलार्डने अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना सीमारेषेवर उत्कृष्ट झेल टिपला.

या सामन्यात पेशावर झल्मीच्या संघाला कर्णधार बाबर आझम आणि सैम अयुब या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भर घातली. त्यानंतप धावांचा वेग कमी करणं मुलतान सुलतानच्या गोलंदाजांसाठी सोपं काम नव्हतं. पेशावरसाठी मोहम्मद हॅरिस आणि टॉम कोल्हेर कॅडमोर यांनीही झटपट धावा केल्याने पेशावर झल्मीच्या संघाने 19 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या होत्या. मुलतान सुलतानसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या अन्वरकडून संघाला चांगली गोलंदाजी अपेक्षित होती, परंतु त्याने संपूर्ण षटकात एकट्याने 24 धावा देत धावसंख्या 242 धावांपर्यंत नेली.

अन्वर अलीने शेवटच्या षटकात 3 षटकार आणि 1 चौकार लगावला

स्लो ओव्हर रेटमुळे, मुलतान सुलतानला डावाच्या शेवटच्या षटकात 30 यार्डच्या आत 5 खेळाडू ठेवावे लागले. या षटकाबद्दल बोलायचं झालं तर, अन्वर अलीने पहिला चेंडू वाइड टाकला, तर पुढच्या चेंडूवर टॉम कोल्हेर कॅडमोरने षटकार ठोकला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार तर तिसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार लागला. आपल्या षटकातील चौथ्या चेंडूवर अन्वर अलीने पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि एकवेळ सर्वांना वाटले की चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, पण कायरन पोलार्डने शानदार क्षेत्ररक्षण करताना पहिला चेंडू सीमारेषेच्या आत टाकला. नंतर त्याचे कॅचमध्ये रूपांतर केले. यानंतर वहाब रियाझने पाचव्या षटकात षटकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली. या सामन्यात अन्वर अलीने 4 षटकात 66 धावा देत 1 बळी घेतला.

पाहा कायरननं घेतलेला विकेट-

आयपीएलमध्ये पोलार्डकडे नवी जबाबदारी

निवृत्तीनंतरही पोलार्ड मुंबई इंडियन्स संघासोबतच (Mumbai Indians) राहणार असून तो मुंबईच्या फलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पोलार्डने निवृत्ती घेताना शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने याबाबतची माहिती दिली आहे.  आपल्या स्टार खेळाडूला आता कोचिंग देताना पाहणं मुंबई संघासह चाहत्यांसाठी एक खास अनुभव असणार आहे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द
Kishori Pednekar : दुबार नावची तक्रार, प्रिंटींग मिस्टेक म्हणून आयोगाचे हात वर ? : किशोरी पेडणेकर
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Smriti Palash Wedding News : स्मृती-पलाशचं लग्न व्हायरल चॅटमुळे थांबलं? उलटसुलट चर्चा सुरूच
Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
Gautam Gambhir On Resignation: तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
तुम्ही कसोटी क्रिकेटसाठी सर्वोत्तम मुख्य प्रशिक्षक आहात?; पत्रकारांच्या प्रश्नावर गौतम गंभीर धडाधड बोलला, म्हणाला, मी तोच व्यक्ती...
Ajit Pawar: अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
अंबाजोगाईच्या सभेतील भाषणात अजित पवारांच्या तोंडातून नको तो शब्द बाहेर पडला, सपशेल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
धक्कादायक! वरिष्ठांचा जाच, ग्रामसेवकाने संपवलं जीवन; कुटुंबीयांचा पोलिसांपुढे आक्रोश, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
अपघातांची मालिका संपेना! अतिवेग नडला, कर्नाटक डेपोची बस थेट दरीत कोसळली, 20हून अधिक प्रवासी जखमी; कराडमध्येही अपघातात दोघांचा मृत्यू
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
आपल्या नातवाला बॉम्बे स्कॉटिशपेक्षा बालमोहन विद्या मंदिरात दाखला द्या; भाजपचा राज ठाकरेंवर पलटवार
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
घरातलं भांडण विकोपाला गेलं, पत्नीनं विहिरीत उडी मारली, नवरा वाचवायला गेला पण दोघांचाही जीव गेला, वाशीम हादरलं
Anjali Damania and Ajit Pawar: पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीवर अंजली दमानियांचे खळबळजनक आरोप, अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी, अमित शाहांकडे जाण्याची तयारी
24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर... अंजली दमानियांनी अमित शाहांना मेल धाडला, म्हणाल्या...
Embed widget