Pro Kabaddi League 2021-22: तेलंगणा पहिल्या विजयाच्या शोधात, तीन वेळच्या विजेत्या पाटणाशी आज लढणार
Telugu Titans vs Patna Pirates: बंगळुरूच्या ग्रांड व्हाईफील्डमध्ये आजचा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात तेलंगणाच्या संघाला अजूनही विजयाचं खातं उघडता आलं नाही.
Telugu Titans vs Patna Pirates: प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामातील 31 व्या सामन्यात तेलंगणा आणि पाटणा यांच्यात आज सामना रंगणार आहे. बंगळुरूच्या ग्रांड व्हाईफील्डमध्ये आजचा सामना खेळला जाणार आहे. या हंगामात तेलंगणाच्या संघाला अजूनही विजयाचं खातं उघडता आलं नाही. तसेच तेलंगणाच्या संघाला एकदाही प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात पोहचता आलं नाही. तेलंगणा संघाचा आज तीन वेळा प्रो कबड्डीचं किताब जिंकलेल्या पाटणाशी होणार आहे.
या हंगामात पाटणानं आतापर्यत तीन सामने जिंकले असून 28 अंकासह चौथ्या स्थानावर आहे. तसेच तेलंगणाचा संघ त्याच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. पाटणाला दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. तर, दोन सामने अनिर्णित ठरले. तेलंगणा विरुद्ध पाटणा यांच्यातील सामना आज रात्री 8.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे थेट लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट नेटवर्क आणि हॉटस्टारवर पाहता येणार आहे.
तेलंगणाचा संघ आज त्यांच्या पाचवा सामना रोहित कुमारचा संघ पाटणाशी खेळणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात तेलंगणा विरुद्ध तामिळनाडू सामना अनिर्णित ठरला. त्यानंतर तेलंगणाच्या संघाला पुण्याकडून पराभव स्वीकारावा लागलाय. तेलंगणाला त्यांच्या तिसऱ्या सामन्यातही हरियाणाकडून पराभव पत्कारावा लागला आणि चौथा सामना अनिर्णित ठरला.
तेंलगणा आणि पाटणा यांच्यात आतापर्यंत 17 सामने खेळण्यात आले आहेत. यापैकी तेलंगणाच्या संघानं 9 सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाटणाच्या संघाला 7 वेळा तेलंगणाला पराभूत करण्यात यश आलंय. या दोन्ही संघामध्ये एक सामना अनिर्णित ठरलाय. या हंगामात पाटणाचा संघ प्रो कबड्डीच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर, तेलंगणाचा संघ त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha