आयपीएलमध्ये शतकी खेळी करत धमाका करणाऱ्या वैभव सूर्यवंशीबाबत पीएम मोदींचं मोठं वक्तव्य
PM Narendra Modi big statement on Vaibhav suryavanshi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सुर्यवंशी याच्याबाबत भाष्य केलंय.

PM Modi Big Statement on Vaibhav Suryavanshi : आयपीएल 2025 (ipl 2025) मध्ये 25 चेंडूमध्ये शतक झळकावणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi ) सध्या क्रीडा क्षेत्रासह संपूर्ण देशात तुफान चर्चा सुरु आहे. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी देखील वैभव सूर्यवंशीबाबत भाष्य केलंय. पीएम मोदी म्हणाले, तो जेवढा जास्त खेळेल तितकाच त्याचा खेळ आणखी सुधारेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खेलो इंडिया युथ गेम्स 2025 चे उद्घाटन झाले. हा समारंभ पाटलीपुत्र स्टेडियममध्ये पार पडला. यावेळी पीएम मोदी म्हणाले, मी वैभव सूर्यवंशीची बॅटींग पाहिली. आम्ही सर्वांनी बिहारच्या वैभव सुर्यवंशीची फलंदाजी पाहिली. वैभवने फार कमी वयात मोठा विक्रम करण्याचा पराक्रम केलाय. त्याच्या खेळामागे त्याची मोठी मेहनत आहे. मात्र वेगवेगळ्या स्तरावर फलंदाजी केल्याने त्याला मोठी मदत झाली. याचा अर्थ असा की, तो जेवढा जास्त खेळेल तितकाच त्याचा खेळ आणखी सुधारेल.
Best wishes to the athletes participating in the Khelo India Youth Games being held in Bihar. May this platform bring out your best and promote true sporting excellence. @kheloindia https://t.co/jlOrc6qO1U
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2025
सचिनकडून तोंडभरुन कौतुक
14 वर्षीय वैभव सुर्यवंशीने गुजरात टायटन्सविरोधात दमदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या 35 चेंडूमध्ये शतक झळकावण्याचा प्रयत्न केला. पुरुषांच्या टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतकी खेळी करण्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीने आपल्या नावावर केलाय. याशिवाय आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू बनलाय. तो सर्वात वेगवान शतक झळकवणाऱ्या खेळाडूच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय, पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेलचं नाव आहे.
Best wishes to the athletes participating in the Khelo India Youth Games being held in Bihar. May this platform bring out your best and promote true sporting excellence. @kheloindia https://t.co/jlOrc6qO1U
— Narendra Modi (@narendramodi) May 4, 2025
दरम्यान, सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर वैभवबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सचिन म्हणाला, वैभवचा निर्भिड आहे. त्याने गुजरातविरोधात उत्तम कामगिरी केलीये.
सोशल मीडियासह खेळाडूंकडून वैभववर कौतुकाचा वर्षाव
शतकी खेळी केल्यानंतर वैभववर सर्वांकडून कौतुक होत आहे. सूर्यकुमार यादव म्हणाला, या युवा खेळाडूची फलंदाजी पाहिली. अविश्वसनीय आहे...युवराज सिंग म्हणाला, 14 वर्ष वय असताना तुम्ही काय करत आहात? हा मुलगा पाहाता पाहाता जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करतोय. वैभव सूर्यवंशी हे नाव लक्षात ठेवा..तो निर्भिडपणे खेळतोय. पुढील पिढीसाठी हे आशादायक आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















