एक्स्प्लोर

Pat Cummins Travis Head News : आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, ऑस्ट्रेलियाच्या 'या' दोन खेळाडूंनी देशासाठी आयपीएलची कोट्यवधी रुपयांची ऑफर धुडकावली, नेमकं काय घडलं?

Pat Cummins Travis Head News : सध्या जगभरात टी20 फ्रँचायझी क्रिकेटचा जबरदस्त बोलबाला आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा फ्रँचायझी क्रिकेटलाच प्राधान्य देताना दिसत आहेत.

Pat Cummins Travis Head Reject Rs 58 Crore Per Year Deal : सध्या जगभरात टी20 फ्रँचायझी क्रिकेटचा जबरदस्त बोलबाला आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा फ्रँचायझी क्रिकेटलाच प्राधान्य देताना दिसत आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग मानली जाते, जिथे खेळाडूंवर अक्षरशः पैशांचा पाऊस पडतो. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि जबरदस्त फलंदाज ट्रॅव्हिस हेड (Travis Head) यांनी आयपीएल 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता या दोघांबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका आयपीएल फ्रँचायझीने या दोघांना विविध टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी प्रचंड मोठी ऑफर दिली होती, पण त्यासोबत एक चकित करणारी अट ठेवली होती. त्या ऑफरनुसार, दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पॅट कमिन्स आणि स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांना फ्रँचायजी क्रिकेट खेळण्यासाठी दरवर्षी तब्बल 10 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे 58 कोटी रुपये) इतका ऑफर देण्यात आला होता. सध्या कमिन्स आपल्या केंद्रीय करार, कर्णधारपद आणि सामन्यांची फी मिळून सुमारे 26 कोटी रुपये कमावतात. हेड सर्व फॉरमॅटमध्ये खेळूनही आपल्या कर्णधारापेक्षा कमी कमाई करतो. तरीदेखील, दोघेही ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास कटिबद्ध आहेत.

या आश्चर्यकारक ऑफरनंतर बिग बॅश लीग (BBL)च्या खासगीकरणाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ऑस्ट्रेलियन टी20 लीगला दशकभराहून अधिक काळ झाला असला तरी, खेळाडूंना फार मोठे मानधन मिळत नाही. दरम्यान, कमिन्स आणि हेड हे वर्षभर फ्रँचायजी क्रिकेट खेळण्याचा प्रस्ताव नाकारलेले पहिले खेळाडू नाहीत. असा दावा केला जातो की, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यानेही 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आलेला असाच प्रस्ताव नाकारला होता.

हैदराबादने ट्रॅव्हिस हेडला 14 कोटीं दिले, तर...

सनरायझर्स हैदराबाद (SRH)ने मेगा ऑक्शनपूर्वी कमिन्सला 18 कोटी रुपयांत रिटेन केले होते. त्यानंतर 2024 च्या आयपीएल लिलावात त्यांना 20.5 कोटी रुपयांत डील करण्यात आले, मात्र पुढील वर्षी त्यांच्या पगारात कपात झाली. वनडे विश्वविजेता कर्णधार कमिन्सने एसआरएचचे नेतृत्व दोन हंगाम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएल 2024 मध्ये अंतिम फेरी गाठली, पण 2025 मध्ये सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. दरम्यान, एसआरएचने ट्रॅव्हिस हेडला 14 कोटी रुपयांत रिटेन केले होते.

हे ही वाचा -

Women's World Cup 2025 Points Table : स्वत: तर घाण केलीच टीम इंडियाचंही वाट्टोळं केलं, पाकिस्तानची पराभवाची हॅटट्रिक, पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण
Rohit Pawar On Voting : सर्वसामान्य जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पाठिशी - रोहित पवार
Devendra Fadnavis PC आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी, मतमोजणी पुढे ढकलल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Nagar Parishad and nagar panchayat Election: पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
पुणे जिल्ह्यात दुपारी दिड वाजेपर्यंत 35.69 टक्के मतदान; जास्त टक्केवारी वडगावमध्ये तर सर्वांत कमी दौंडमध्ये
Hasan Mushrif: '...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
'...त्यावर बोलण्यात अर्थ नाही', उद्याची मतमोजणी रद्द, हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री हसन मुश्रीफांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजनांसारखा मी वाया गेलो नाही, आता महाजनांकडून जशास तसं उत्तर; म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या रेसमधला माणूस असा...
Nagarparishad Election Result: उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
उद्याची मतमोजणी रद्द; हायकोर्टाचा मोठा निर्णय, आता काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर
Nagarparishad Election Result: निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Mahad Nagarparishad Election: सुनील तटकरेंनी हल्ला करायला लोकं पाठवली, माझ्यावर रिव्हॉल्व्हर रोखली, कार्यकर्त्याने चपळाई दाखवत.... विकास गोगावलेंनी स्टार्ट टू एंड सगळं सांगितलं
माझ्या कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर हिसकावली नसती तर मला गोळी लागली असती, भरत गोगावलेंच्या मुलाचा खळबळजनक दावा
Sanjay Raut on Eknath Shinde: 'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
'मालवणमध्ये भाजपच्या थैल्यांना बॅगेने उत्तर'; एकनाथ शिंदेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत संजय राऊत कडाडले
Embed widget