Pakistan Squad Champions Trophy : अखेर तो दिवस उजाडला... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघाची घोषणा! कोण आहे कर्णधार? कोणत्या 15 खेळाडूंना संधी? जाणून घ्या A टू Z
Pakistan Squad Announced for Champions Trophy : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये रँकिंगच्या आधारे टॉप-8 संघ सहभागी होत आहेत.

Champions Trophy 2025 Pakistan Squad : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या यजमानपदाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे, ज्यामध्ये रँकिंगच्या आधारे टॉप-8 संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी 7 संघांनी आधीच त्यांचे संघ जाहीर केले होते, पण यजमान पाकिस्तान संघाच्या घोषणेची वाट पाहावी लागली. दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर गतविजेत्या पाकिस्ताननेही अखेर 31 जानेवारीच्या संध्याकाळी त्यांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये एकूण 4 खेळाडू बऱ्याच काळानंतर संघात परतले. 2017 मध्ये भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा सलामीवीर फलंदाज फखर झमाननेही पुनरागमन केले आहे.
Pakistan name ICC Champions Trophy 2025 squad
— PCB Media (@TheRealPCBMedia) January 31, 2025
Details here ➡️ https://t.co/XfswdRVWrO #WeHaveWeWill | #ChampionsTrophy pic.twitter.com/kGA9hJr4dV
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान संघाची घोषणा!
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या पाकिस्तानी संघात फखर जमान व्यतिरिक्त फहीम अशरफ, खुशदिल शाह आणि सौद शकील यांची नावे आहेत. याशिवाय, बाबर आझम, फहीम अशरफ आणि फखर जमान, जे 2017 मध्ये पाकिस्तानने शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले. तेव्हा संघाचा भाग होते, ते यावेळीही स्पर्धेत खेळताना दिसतील. दुखापतीमुळे सईम अयुब स्पर्धेत खेळत नसल्याने, फखर झमानसोबत बाबर आझम किंवा सौद शकील हे डावाची सुरुवात करताना दिसतील.
ICC Champions Trophy 2️⃣0️⃣1️⃣7️⃣ winners announce squad for the 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ event 🏆✨
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 31, 2025
How will you show your support for the Pakistan team❓#ChampionsTrophy | #WeHaveWeWill pic.twitter.com/zDYPFuqzBU
आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 मधील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान संघाने आतापर्यंत तीन एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत, त्यापैकी त्यांनी ऑस्ट्रेलियाला 2-1 ने हरवले, त्यानंतर त्यांनी झिम्बाब्वेविरुद्धची मालिकाही 2-1 ने जिंकली, तर दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय मालिकेत 3-0 पराभव केला.
घरच्या मैदानावर तिरंगी मालिका!
पाकिस्तानी संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घरच्या मैदानावर तिरंगी मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये त्यांच्याशिवाय न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ देखील सहभागी होतील. ही मालिका 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान खेळवली जाईल. पीसीबीने स्पष्ट केले आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर केलेला संघ या तिरंगी मालिकेतही खेळताना दिसेल.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान संघ (Pakistan Squad for Champions Trophy 2025) -
बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा (उपकर्णधार), मोहम्मद रिजवान (कर्णधार), उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह , शाहीन शाह आफ्रिदी.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
