एक्स्प्लोर

ICC World Cup 2023 साठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार नाही? PCB अध्यक्षांची BCCI समोर विचित्र अट

ICC World Cup 2023: सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयनं काही महिन्यांपूर्वीच टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असं बीसीसीआयनं जाहीर केलं आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू झाले. 

ICC World Cup 2023: आगामी एकदिवसीय विश्वचषक (ICC World Cup 2023) साठी सर्व संघ सज्ज झाले आहेत, परंतु भारता शेजारील देश पाकिस्तानची वृत्ती काहीशी विचित्र आहे. खरं तर आशिया चषक स्पर्धेचं ठिकाण ठरवण्यावरून गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, आशिया कप 2023  (Asia Cup 2023) च्या यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तानकडे सोपवण्यात आली आहे. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव बीसीसीआयनं काही महिन्यांपूर्वीच टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळणार नाही, असा निर्णय घेतला होता. तेव्हापासूनच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहेत. 

पीसीबीच्या अध्यक्षांची BCCI ला धमकी 

बीसीसीआयच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आक्षेप घेतला. यानंतर, पाकिस्ताननं आशिया क्रिकेट कौन्सिलसमोर (ACC) ला एक 'हायब्रीड मॉडेल' सादर केलं. पाकिस्तानच्या या हायब्रीड मॉडेलनुसार, भारत-पाकिस्तान सामना UAE किंवा इतरत्र व्हावेत आणि इतर संघ पाकिस्तानमध्येच आपले सामने खेळतील असं सांगण्यात आलं होतं.  

परंतु, पीसीबीचा प्रस्ताव स्वीकारण्यास एसीसीनं नकार दिला. आता हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. यासाठी कारण ठरलं आहे, ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांचं वक्तव्य. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटलं आहे की, जर टीम इंडिया आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार नसेल तर पाकिस्तानचा संघही आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतात जाणार नाही. दरम्यान, 2025 मध्ये पाकिस्तान चॅम्पियनशिप ट्रॉफीचं आयोजनही करणार आहे.

बीसीसीआयनं तर्कशुद्ध निर्णय घ्यावा : नजम सेठी

नजम सेठी म्हणाले की, "बीसीसीआयची अशी इच्छा आहे की, त्यांनी ठरवलेल्या स्टेडियमवरच हा सामना व्हावा. पण आमची इच्छा आहे की, बीसीसीआयनं एक चांगला, तर्कशुद्ध निर्णय घ्यावा, जेणेकरून आम्हाला पुढे जाण्यात कोणतीही अडचण येऊ नये. पुढे बोलताना ते म्हणाले की, "आम्हालाही आमच्या संघाच्या (पाकिस्तान) सुरक्षेची चिंता आहे. आयसीसीनं या प्रकरणात हस्तक्षेप करायला हवा, पण या प्रकरणात आयसीसीनं दखल द्यावी, अशी बीसीसीआयची अजिबात इच्छा नाही, असंही ते म्हणाले. 

नजम सेठी पुढे बोलताना म्हणाले की, भारतीय बेसबॉलपासून ते कबड्डीपर्यंतचे अनेक संघ पाकिस्तानमध्ये स्पर्धांसाठी येतात. पण टीम इंडियालाच काय अडचण आहे?

यंदा आशिया कप एकदिवसीय स्वरुपात

यावेळची आशिया कप स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार असून एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह क्वालिफायर 1 चा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. यामध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये 6 सुपर 4 सामने होणार आहेत. यानंतर डिसेंबरमध्ये 19 वर्षाखालील पुरुष आशिया चषक स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे.

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget