एक्स्प्लोर

आशिया चषकात पाकिस्तानची विजयी सुरुवात, नेपाळचा 238 धावांनी पराभव

PAK vs NEP Match Report : आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळचा 328 धावांनी दारुण पराभव करत दिमाखात सुरुवात केली आहे.

PAK vs NEP Match Report : आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळचा 328 धावांनी दारुण पराभव करत दिमाखात सुरुवात केली आहे. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 6 विकेट्सच्या मोबद्लयात 342 धावांचा डोंगर उभारला होता. पाकिस्तानच्या विराट आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळचा संघ अवघ्या 104 धावांत गारद झाला. पाकिस्तानकडून बाबर आझम याने 151 धावांची खेळी केली तर इफ्तिकार अहमद याने 109 धावांचे महत्वाचे योगदान दिले. तर गोलंदाजीमध्ये शादाब खान याने नेपाळच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवले. पाकिस्तानचा पुढील सामना भारताविरोधात शनिवारी होणार आहे. 

पाकिस्तानने दिलेल्या 342 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नेपाळच्या संघाची सुरुवात खराब झाली. शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. नेपाळने तीन फलंदाज 14 धावांत गमावले होते. त्यानंतर समोपाल कामी आणि आरिफ शेक यांनी संघर्ष केला, पण दोन्ही फलंदाज फारकाळ तग धरू शकले नाहीत. पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर नेपाळचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. संपर्ण संघ 104 धावांत गारद झाला. आठ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. नेपाळकडून सोमपाल कामी याने सर्वाधिक 28 धावांचे योगदान दिले. 
 
मुल्तान येथे आशिया चषकाचा दमदार शुभारंभ झाला. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  नवख्या नेपाळपुढे पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तात परतले, पण बाबर आझम याने पाकिस्तानचा डाव सांभळला. बाबर आझम याने संयमी सुरुवात करत पाकिस्तानचा डाव सावरला. त्यानंतर विस्फोटक फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. इफ्तिखारसोबत बाबर आझम याने द्विशतकी भागिदारी केली. त्याशिवाय मोहम्मद रिझवान याच्यासोबत 86 धावांची भागिदारी केली.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अवघ्या 25 धावांवर दोन महत्वपूर्ण विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि दीडशतक ठोकले. मोहम्मद रिझवान याच्यासोबत बाबर आझम याने 86 धावांची भागिदारी केली. मोहम्मद रिझवान 44 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आगा सलमानही स्वस्तात तंबूत परतला. एका बाजूला विकेट पडत असताना बाबरने दुसऱ्या बाजूने दमदार फलंदाजी सुरुच ठेवली होती. 

बाबर आझम याने इफ्तिखार अहमद याच्या साथीने पाकिस्तानची धावसंख्या वाढवली. पाचव्या विकेटसाठी बाबर आणि इफ्तिखार यांनी 134 चेंडूमध्ये 214 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 300 धावांचा पल्ला पार केला. इफ्तिखार अहमद याने अवघ्या 71 चेंडूमध्ये 109 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चारषटकार आणि 11 चौकार ठोकले. बाबर आझम याने 131 चेंडूत 151 धावांची खेळी केली. यामध्ये 14 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.   

नेपाळच्या गोलंदाजांनी दमदार सुरुवात करत पाकिस्तानच्या फलंदाजांना बांधून ठेवले होते. सलामी फलंदाज फखर जमान 14 आणि इमाम उल हक 5 धावा काढून तंबूत परतले. सलामीची जोडी लवकर परतल्यामुळे पाकिस्तान संघावर दबाव वाढला होता. पाकिस्तान संघ एकवेळ 27 षटकात चार बाद 124 अशा कठीण स्थितीत होता. पण इफ्तिखार अहमद याने आक्रमक फलंदाजी करत सामन्याचे चित्र बदलले. बाबर आझम आणि इफ्तिखार यांनी नेपाळची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी द्विशतकी भागिदारी करत पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्यापर्यंत पोहचवले. 

नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केली. पण अखेरच्या 20 षटकात त्यांची लय गमावली. अखेरच्या 20 षटकात पाकिस्तान संघाने जवळपास 200 धावा चोपल्या. पाकिस्तानकडून सोमपाल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने दोन विकेट घेतल्या. करन आणि संदीप यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 08 November 2024Ajay Chaudhari Shivdi Vidhan Sabha | शिवडीसाठी दोन ठाकरे आमने-सामने! अजय चौधरी म्हणाले...Ajay Chaudhari on BJP : भाजपने राज ठाकरेंना जवळ केलं, आता शिंदेच्या पाठित खंजीर खुपसणारABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 08 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Embed widget