'फादर्स डे'ला युवराज सिंहने सांगितलं मुलाचं नाव, cute फोटोही केला पोस्ट
Yuvraj Singh, Hazel Keech reveal son's name : फादर्स डेच्या दिवशी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आणि हेजल किच यांनी आपल्या मुलाचं नाव सांगितलेय.
Yuvraj Singh, Hazel Keech reveal son's Name : फादर्स डेच्या दिवशी भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह आणि हेजल किच यांनी आपल्या मुलाचं नाव सांगितलेय. युवराजने सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळाचे नाव Orion Keech Singh असे ठेवल्याचं सांगितलेय. 25 जानेवारी रोजी युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि त्याची पत्नी हेजल कीच (Hazel Keech) यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यावेळी सोशल मीडियावर पोस्ट करत युवराजने माहिती दिली होती. आता फादर्स डेला युवराजने बाळाचे नाव सांगितलेय.
View this post on Instagram
12 नोव्हेंबर 2015 मध्ये हेजल आणि युवराजचा साखरपुडा झाला. 30 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांचा विवाह सोहळा पार पडला. युवराजची पत्नी हेजल ही अभिनेत्री आहे. तिने जाहिरातींमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' या चित्रपटामध्ये हेजलनं प्रमुख भूमिका साकारली आहे.