On This Day: विराट कोहलीसाठी आजचा दिवस खूप खास, इंग्लंड दौऱ्यात गेल्या वर्षी लॉर्ड्सवर रचला इतिहास!
Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झुंज देतोय.
Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्मशी झुंज देतोय. परंतु, अजूनही त्याची भारतीय संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये गणना केली जाते. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं आतापर्यंत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. त्याच्या नेतृत्वात भारतानं अनेक महत्वाच्या सामन्यात विजय मिळवलाय. ज्यात भारतानं लॉर्ड्समध्ये (Lords) मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचाही समावेश आहे. ज्याला आज एक वर्षपूर्ण झालंय. भारतीय संघानं 16 ऑगस्ट 2021 मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी लॉर्ड्स येथे खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये लॉर्ड्समध्ये इंग्लंडच्या संघाला पराभूत करणारा विराट कोहली तिसरा भारतीय कर्णधार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्याच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स येथे खेळण्यात आला.या सामन्यात भारताचा पहिला डाव 364 धावांवर गारद झाला. भारताचा सलामीवीर केएल राहुलनं पहिल्या डावात शतक झळकावलं. त्यानं 129 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 391 धावा करत सर्वबाद झाला. कर्णधार जो रूटनं संघासाठी 180 धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारताकडून पहिल्या डावात इशांत शर्मानं तीन आणि मोहम्मद सिराजनं चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर भारतानं दुसरा डाव 298 धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 120 धावा करून सर्वबाद झाला. सिराजनं दुसऱ्या डावातही चार विकेट्स घेतल्या. भारतानं ही कसोटी 151 धावांनी जिंकली.
विराट कोहलीची ऐतिहासिक कामगिरी
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं लॉर्ड्समध्ये कसोटी सामना जिंकून इतिहास रचला. तसेच लॉर्ड्सवर कसोटी सामना जिंकणार विराट कोहली तिसरा भारतीय कर्णधार ठरला. विराट कोहलीच्या आधी कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं इंग्लंडला लॉर्ड्समध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं दुसऱ्यांदा लॉर्ड्समध्ये विजय मिळवला. धोनीच्या नेतृत्वात भारतानं इंग्लंडचा 95 धावांनी पराभव केला होता.
विराट कोहलीची कसोटी कारकिर्द
विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये जून महिन्यात 11 वर्षे पूर्ण केली आहेत. विराटनं या 11 वर्षात टीम इंडियासाठी अनेक चांगल्या खेळी खेळल्या आहेत. एक कर्णधार म्हणूनही विराट कोहली यशस्वी ठरला आहे.विराट कोहलीला 2011 मध्ये पहिल्यांदा पांढऱ्या जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने भारतासाठी आतापर्यंत 102 कसोटी सामने खेळले आहेत. कोहलीनं या कसोटी सामन्यांमध्ये 7 द्विशतके, 27 शतके आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 8074 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-