एक्स्प्लोर

World Cup 2023: श्रेयस अय्यरच्या जागी सूर्याला का संधी मिळावी? हार्दिक परतल्यानंतरही रोहित कठोर निर्णय घेणार?

Shreyas Iyer : विश्वचषकात श्रेयस अय्यर याला अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आघाडीच्या विकेट पडल्यानंतरही चुकीचा फटका मारुन अय्यर बाद झाला.

Shreyas Iyer And Suryakumar Yadav : विश्वचषकात श्रेयस अय्यर याला अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आघाडीच्या विकेट पडल्यानंतरही चुकीचा फटका मारुन अय्यर बाद झाला. आतापर्यंत भारतीय संघाने सहाही सामन्यात विजय मिळवलाय, पण हीच कमकुवत बाजू पुढील सामन्यात डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव अथवा ईशान किशन  संधी द्या..या मागणीने जोर धरलाय. 

 दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारला दोन सामन्यांमध्ये संधी मिळाली, ज्याचा त्याने चांगला फायदा घेतला. तर श्रेयस अय्यर या स्पर्धेत अपयशी ठरला आहे. अय्यरला सहा साममन्यात फक्त एक अर्धशतक ठोकता आलेय. त्याला आतापर्यंत फक्त 134 धावा करता आल्यात. त्यामुळे हार्दिक पांड्या आल्यानंतर अय्यरचा पत्ता कट होणार, असाच अंदाज बांधला जातोय. 

अय्यरला सक्तीचा आराम ?

दोन नोव्हेंबर रोजी मुंबईत टीम इंडिया श्रीलंकाविरोधात खेळणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याचे कमबॅक होईल, असा अंदाज वर्तवला जातोय. हार्दिकच्या पुनरागमनानंतर सूर्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण, आता श्रेयस अय्यरचा खराब फॉर्म पाहता त्याला बेंचवर बसावे लागू शकते. 

सूर्यकुमार यादव शानदार फिनिशिंग करु शकतो.  शेवटच्या षटकांत झटपट धावा काढण्याची क्षमता सूर्याकडे आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सूर्याचे आकडे  खास नसले तरी संघाचा त्याच्यावर विश्वास आहे. सूर्याने टी-20   सामन्यात संघासाठी अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत.  सध्या अय्यरचा खराब फॉर्म असल्यामुळे सूर्याला संधी दिली जाऊ शकते.

चौथ्या क्रमांकावर अय्यर फ्लॉप - 

2011 च्या विश्वचषकापासून भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, हे पडलेले कोडे सुटले नाही. 2023 च्या विश्वचषकात टीम इंडियाने श्रेयस अय्यर याला संधी दिली, पण तोही अद्याप शानदार कामगिरी करु शकला नाही. सहा सामन्यात अय्यरला फलंदाजीची संधी मिळाली, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरोधात अय्यरने अर्धशतक ठोकले, पण त्यावेळी भारतीय संघ सुस्थितीत होता. त्याशिवाय इतर सामन्यात अय्यरला चांगल्या सुरुवातीनंतरही मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात श्रेयस अय्यर चुकीचा फटका मारुन बाद झाला. बाऊन्सर चेंडूवर अय्यर आपली विकेट फेकतो, हे प्रतिस्पर्धी संघाला आता समजलेय. त्यामुळे सेमीफायनलच्या आधी अय्यर फॉर्मात परतला नाही, तर टीम इंडियाला मोठा फटका बसू शकतो.  

विश्वचषकात  श्रेयस अय्यरची कामगिरी - 

ऑस्ट्रेलिया - 0  धावा

अफगाणिस्तान - 23 चेंडूत 25 धावा

पाकिस्तान - 62 चेंडूत नाबाद 53 धावा

बांगलादेश - 25 चेंडूत 19 धावा

न्यूझीलंड -  29 चेंडूत 33 धावा 

इंग्लंड - 16 चेंडूत 4 धावा

अय्यरची वनडे कामगिरी - 
श्रेयस अय्यर याने 53 वनडे सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामध्ये त्याने  1935 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने तीन शतके ठोकली आहेत.अय्यरने 15 अर्धशतकेही लगावली आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour With Bhai Jagtap MVA Seat Sharing : Mumbai तील कोणत्या आणि कितीजागांसाठी मविआत संघर्ष?Zero Hour Full : मविआचं मुंबईतील जागावाटप ते वाराणसी घटनेवरुन महाराष्ट्रात राजकारणABP Majha Headlines : 9 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur News : हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
हर्षवर्धन पाटील वेट अँड वॉचच्या भूमिकेत? महायुतीच्या जागावाटपापर्यंत निर्णय घेणार नाहीत, सूत्रांची माहिती
Benjamin Netanyahu : बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
बायको प्रेग्नंट असताना गर्लफ्रेंडसोबत संबंध, एअर होस्टेसशीही लगीनगाठ;तीन लग्न करणाऱ्या नेत्यानाहूंनी सेक्स व्हिडिओबाबत माफी मागितली होती
Badlapur Rape Case : मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील फरार झालेल्या शाळेच्या ट्रस्टींना पोलिसांकडून अटक
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
पुण्यात बिल्डरचा तुफान राडा,रहिवाशांना दंडुक्याने मारहाण; महिलांसमोरच अश्लील शिवीगाळ
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
मुंबईतील बुलेट ट्रेन, भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा; काम प्रगतीपथावर, पाहा फोटो
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग, पण युट्युबचा कोण माहितीय का?
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! मुंबईतील 36 नगरसेवकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
खुशखबर! मध्य वैतरणा धरणातून 26.5 मेगावॉट संकरीत वीजनिर्मिती; वर्षाला सुमारे 9 कोटी रूपयांची होणार बचत
Embed widget