IND vs AFG Match Highlights: : भारताचा विश्वचषकातील दुसरा विजय, अफगाण संघाला 8 विकेटने हरवले

ODI World Cup 2023, IND Vs AFG : बांगलादेशविरुद्धच्या दारुण पराभवानंतर, अफगाणिस्तानचे दिल्लीमध्ये परिस्थिती बदलण्याचे लक्ष्य असेल.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 11 Oct 2023 08:59 PM
भारताचा अफगाणिस्तानवर 8 विकेटने विजय

भारताचा अफगाणिस्तानवर 8 विकेटने विजय

विराट कोहलीचे दमदार अर्धशतक

विराट कोहलीने 55 चेंडूत अर्धशतक ठोकले. 

विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरमध्ये अर्धशतकी भागिदारी

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरमध्ये अर्धशतकी भागिदारी पूर्ण झाली आहे. भारताला विजयासाठी 18 धावांची गरज

भारताला दुसरा धक्का

राशिद खान याने रोहित शर्माला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. पण त्यापूर्वी रोहित शर्माने आपले काम पूर्ण केले. रोहित शर्माने 273 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 84 चेंडूत 131 धावांची खेळी केली. स्टेडिअममधील चांहत्यांनी उभं राहत खेळीचं कौतुक केले. 

Rohit Sharma : रोहित शर्माने मोडला मोठा विक्रम, सचिन-गांगुलीला मागे टाकले, पहिल्या स्थानावर विराजमान
रोहित शर्माने मोडला 40 वर्षांपूर्वीचा विक्रम, कपिल देवला टाकले मागे
विजय भारताच्या दृष्टीक्षेपात

भारताला विजयासाठी 25 षटकात 71 धावांची गरज,, रोहित वादळात अफगाण गोलंदाज उडाले

रोहित शर्माची वादळी फलंदाजी

Rohit Sharma, World Cup : भारताच्या रोहित शर्मानं कर्णधारास साजेशी खेळी उभारून अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक साजरं केलं आहे. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 273 धावांचं आव्हान दिलं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ईशान किशनच्या साथीनं भारताला शतकी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहितला भोपळाही फोडता आला नव्हता. त्या अपयशाची त्यानं आज अफगाणिस्तानविरुद्ध शतकानं भरपाई केली. रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतलं हे 31 वं आणि विश्वचषकातलं सातवं शतक ठरलं. त्याच्या 63 चेंडूंमधल्या शतकाला 12 चौकार आणि चार षटकारांचा साज आहे. रोहित शर्माने या शतकी खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहित शर्माने सचिनच्या सर्वाधिक षटकारांचा, ख्रिस गेलच्या सर्वाधिक षटकारांचा, विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावा.. त्यासह कपिल देव यांच्या 40 वर्षांपूर्वीचा विक्रमही उद्धवस्त झाला. रोहित शर्माने अवघ्या 63 चेंडूत शतक ठोकले. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात 72 चेंडूत शतक ठोकले होते. हा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला. 

रोहित शर्माच्या नावावर आणखी एक विक्रम

विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा झाला आहे. रोहित शर्माने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. 

भारताला पहिला धक्का

ईशान किशनच्या रुपाने भारताला पहिला धक्का बसला आहे. ईशान किशन 47 धावांवर बाद झाला.

सचिनचा विक्रम मोडला

Rohit Sharma, World Cup : रोहित शर्माने अफगाणिस्तानविरोधात सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोहित शर्माने विश्वचषकातील सातवे शतक ठोकले. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सहा शतके ठोकली आहेत. 

रोहित शर्माची शतकी खेळी

रोहित शर्माने 63 चेंडूमध्ये शतकी खेळी केली. या खेलीमध्ये रोहित शर्माने 12 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने शतक ठोकले आहे.

भारताचे शतक फलकावर

रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. दोघांनी 13 षटकात 113 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 79 तर ईशान किशन 30 धावांवर खेळत आहेत. 

सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर - 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 555 षटकारांची नोंद झाली आहे. रोहित शर्माने 473 आंतरराष्ट्रीय डावात 555 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत.

वर्ल्ड कपमध्ये एक हजार धावा - 

रोहित शर्माने विश्वचषकातील एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे.  2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 19 व्या सामन्यात एक हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीच्या आधी तीन भारतीयांनी हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर , विराट  कोहली आणि सौरव गांगुली यांनी याआधी विश्वचषकात भारतासाठी एक हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.  

भारताची वादळी सुरुवात

272 धावांचा पाठलाग करताना भारताने वादळी सुरुवात केली आहे. 9 षटकात बिनबाद 87 धावा केल्या आहेत.

भारताच्या फलंदाजीला सुरुवात

273 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारताचे सलामी फलंदाज मैदानात उतरले आहेत. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांच्या फलंदाजीकडे लक्ष लागलेय. 

अफगाणिस्तानची 272 धावांपर्यंत मजल

World Cup 2023: जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्याच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने अफगाणिस्तानला 50 षटकात 272 धावांवर रोखले. अफगाणिस्तानकडून कर्णधार शाहीदी याने झुंजार 80 धावांची खेळी केली. तर उमरजाई याने 62 धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानच्या 4 फलंदाजांना तंबूत धाडले तर हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या. सपाट खेळपट्टीवर भारताला विजयासाठी 273 धावांचे आव्हान आहे.


या सामन्यात निर्णायक विजयाच्या दोन गुणांच्या वसुलीसह आपला नेट रनरेट  वाढवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल. अफगाणिस्तानसाठी हा सामना जिंकण्याचं आव्हान खूपच कठीण आहे. पण भारताविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या राशिद खान, मोहम्मद नबी आणि रहमानउल्ला गुरबाज यांच्या कामगिरीवर क्रिकेटरसिकांची नजर राहिल.

बूम बूम बुमराहचा भेदक मारा - 

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमारह याने पॉवरप्ले आणि अखेरच्या षटकात भेदक मारा केला. जसप्रीत बुमराहने आपल्या 10 षटकांमध्ये फक्त 39 धावा खर्च केल्या. बुमराहने अफगाणिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. शार्दूल ठाकूर याने 6 षटकांमध्ये 31 धावा खर्च करत एक विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने 7 षटकात 43 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. मोहम्मद सिराज महागडा ठरला. सिराजला 9 षटकांमध्ये 70 पेक्षा जास्त धावा कुटल्या. 

राशिद खान झेलबाद

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर राशिद खान बाद झाला. कुलदीप यादवने शानदार झेल घेतला. राशिद खानने 12 चेंडूत 16 धावांची खेळी केली.

अफगाणिस्तानचा 250 धावांचा टप्पा

अफगाणिस्तानने 250 धावांचा टप्पा पार केला. राशिद आणि मुजीब यांच्यात दमदार भागिदारी

बुमराहचा भेदक मारा, नबीला पाठवले तंबूत

हाणामारीच्या षटकामध्ये बुमराहने एकाच षटकात दोन फलंदाजांना तंबूत धाडले आहे. नबी याला स्वस्तात तंबूत पाठवत मोठा अडथळा दूर केला. नबी 19 धावांवर बाद झाला.

बुमराहने दिला अफगाणिस्तानला आणखी एक धक्का

अखेरच्या षटकात जसप्रीत बुमराहने भेदक मारा केला. बुमराहने जादरान याला दोन धावांवर तंबूत पाठवले. अफगाणिस्तान सहा बाद 229 धावा

कुलदीप यादवचा शानदाल स्पेल

चायनामन कुलदीप यादव याने आपल्या 10 षटकांचा कोटा पूर्ण केला. कुलदीप यादवने अफगाणिस्तानच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. कुलदीप यादवने आपल्या दहा षटकांमध्ये फक्त 40 धावा खर्च करत एक विकेट घेतली.   रविंद्र जाडेजाने आपल्या 7 षटकांच्या स्पेल 35 धावा खर्च केल्या. जाडेजाला विकेट घेण्यात यश आले नाही.

अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत, अफगाणिस्तानचा कर्णधार 80 धावांवर बाद

कुलदीप यादवच्या फिरकीमध्ये अफगाणिस्तानचा कर्णधार अडकला आहे. हाणामारीच्या षटकात जम बसलेला शाहीदी 80 धावा काढून बाद झाला. अफगाणिस्तान 5 बाद 225 धावा

अखेरच्या दहा षटकांच्या खेळाला सुरुवात

अखेरच्या 10 षटकांच्या खेळाला सुरुवात झाली आहे. अफगणास्तानचा कर्णधार शाहीदी 76 धावांवर खेळत आहे. अफगाणिस्तान 4 बाद 219 धावा झाल्या आहेत. 

अफगाणिस्तानचे द्विशतक फलकावर

36.4 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात अफगाणिस्तान संघाने 200 धावांचा टप्पा पार केला आहे. कर्णधार शाहीदी 63 धावांवर खेळत आहे.

हार्दिक पांड्याने जोडी फोडली, अफगाणिस्तानला चौथा धक्का

उमरजई याला त्रिफाळाचीत बाद करत हार्दिक पांड्या याने भारताला चौथे यश मिळवून दिले आहे. उमरजई याने कर्णधार शाहिदीच्या साथीने अफगाणिस्तानचा डाव सावरला होता. 128 चेंडूमध्ये 121 धावांची भागिदारी केली.

अफगाणिस्तानचा कर्णधाराचे अर्धशतक

58 चेंडूमध्ये शाहिदीने अर्धशतक पूर्ण केले

उमरजईचं अर्धशतक

अफगाणिस्तानचा संघ अडचणीत सापडला असताना उमरजई याने अर्धशतकी खेळी. उमरजई याने 62 चेंडूमध्ये तीन षटकारांच्या मदतीने अर्धशतक ठोकले

पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये दाखल

भारताविरोधात सामना खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. 





अफगाणिस्तानच्या कर्णधाराने डाव सावरला

अफगाणिस्तानचा कर्णधार हाशअमतुल्लाह शाहिदी आणि उमरजई यांनी अफगाणिस्तानचा डाव संभाळला आहे. 30 षटकानंतर आफगाणिस्तानने 3 बाद 147 धावांपर्यंत मजल मारली आहे. शाहिदी 35 तर उमरजई 46 धावांवर खेळत आहे. 63 धावांवर अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला होता. त्यानंतर या दोघांनी डाव सावरला आहे. चौथ्या विकेटसाठी 102 चेंडूमध्ये 84 धावांची भागिदारी केली आहे. 

अफगाणिस्तानच्या 100 धावा फलकावर

भारताच्या भेदक माऱ्यापुढे अफगाणिस्तानच्या फंलदाजांची संयमी सुरुवात... 24 षटकानंतर अफगाणिस्तानने 3 विकेटच्या मोबदल्यात 100 धावा केल्या.

अफगाणिस्तानला तिसरा धक्का

रहमतच्या रुपाने अफगाणिस्तानला तिसरा धक्का बसला आहे. शार्दूल ठाकूरने घेतली विकेट... अफगाणिस्तान तीन बाद 66 धावा.

लॉर्डची कमाल, भारताला दुसरे यश

हार्दिक पांड्याने भारताला दुसरे यश मिळवून दिले. गुरबाज 21 धावांवर बाद... शार्दूल ठाकूरने घेतला जबरा झेल

अफगाणिस्तानचे फलकावर अर्धशतक

अफगाणिस्तानचे फलकावर अर्धशतक झळकले आहे. 10 .5 षटकात एक बाद 50 धावा

भारताला पहिले यश, इब्राहीम जादरान बाद

भारताला पहिले यश, इब्राहीम जादरान बाद झाला आहे. जसप्रीत बुमराह याने दमदार चेंडूवर जादरानला तंबूत पाठवले. जादरान 22 धावांवर बाद झाला. अफगाणिस्तान एक बाद 32 धावा

अफगाणिस्तानची सावध सुरुवात

बुमराह आणि सिराजच्या माऱ्यापुढे अफगाणिस्तानने सावध सुरुवात केली आहे. गुरबाज आणि जादरान यांनी चार षटकात 18 धावांची भागिदारी केली. 

मोहम्मद शामीला स्थान नाही

दिल्लीमध्ये होत असलेल्या सामन्यात मोहम्मद शामी याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची चर्चा रंगली होती. पण रोहित शर्माने शार्दूल ठाकूरसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

अफगाणिस्तानची प्लेईंग 11

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान, अजमतुल्ला ओमरजई, राशिद खान, नवीन उल-हक़, मुजीब उर रहमान, फजलहक़ फारुकी.

भारताची प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

भारतीय संघात एक बदल

भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. खेळपट्टी पाहून भारतीय संघाने शार्दूल ठाकूर याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिले आहे. अश्विन याला प्लेईंग 11 मधून आराम देण्यात आला आहे. 

भारताची प्रथम गोलंदाजी

AFG vs IND, ODI World Cup 2023  : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यामध्ये विश्वचषकाचा सामना सुरु आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान भारतीय संघ प्रथम गोलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानच्या संघात कोणताही बदल कऱण्यात आलेला नाही. पहिल्या सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आला आहे.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना तारीख, वेळ आणि ठिकाण

 


भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना उद्या बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.

थोड्याच वेळात नाणेफेक होणार

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याची नाणेफेक थोड्याच वेळात होणार आहे. 

पार्श्वभूमी

ODI World Cup 2023, IND Vs AFG : वर्ल्डकपच्या सलामीच्या सामन्यात ( ICC Cricket World Cup 2023) अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत विराट कोहली आणि के. एल. राहुलने केलेल्या दमदार फलंदाजीने टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (India vs Afghanistan) दोन हात करताना फलंदाजी सुधारण्यावर टीम इंडियाचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या लढतीत भारताची दोन षटकांत 3 बाद 5 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे सलामीवीर कप्तान रोहित शर्मा, संधी मिळाल्यास इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या श्रेयस अय्यरवर मोठा दबाव असणार आहे. सलामीवीर शुभमन गिल अफगाणविरुद्धच्या सामन्यालाही मुकणार आहे.


बांगलादेशविरुद्धच्या दारुण पराभवानंतर, अफगाणिस्तानचे दिल्लीमध्ये परिस्थिती बदलण्याचे लक्ष्य असेल. दिल्लीच्या लाजपत नगरमध्ये मोठ्या संख्येने अफगाण रहिवासी असल्याने खेळाडूंना चांगला पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे. मुख्यत: फिरकीपटू ही अफगाणिस्तानची गेल्या काही वर्षांपासून मजबूत फळी आहे. प्रभाव पाडायचा असेल तर त्यांच्या फलंदाजांनीही सुधारणा आवश्यक आहे. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज हा एकमेव फॉर्मात आहे. बांगलादेशविरुद्ध 156 धावांचा सर्वबाद झाल्याने फलंदाज तत्काळ सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील.


भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना तारीख, वेळ आणि ठिकाण


भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना उद्या बुधवार, 11 ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होईल.


भारत विरुद्ध अफगाणिस्तान: एकदिवसीय सामन्यांमध्ये रेकॉर्ड


खेळलेले सामने - 3, भारताने जिंकले - 2, अफगाणिस्तान -0, बरोबरीत-1









भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर असेल 


ऑनलाइन मॅच कशी पाहाल?


Disney+ Hotstar वर भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना त्यांच्या अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल


भारताचा संघ


रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर.


अफगाणिस्तान संघ


हशमतुल्ला शाहिदी (कप्तान), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.