सांगली : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे हिंदुत्त्वावादी नेते नितेश राणे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मिरज येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू गर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना नितेश राणेंनी (Nitesh Rane) हिंदुत्वाचा हुंकार भरला. तर, विरोधकांच्या टीकेवर पलटवार करताना आम्ही ईव्हीएममुळेच जिंकलो. पण, ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मोहल्ला असे म्हणत त्यांनी एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्याचं दिसून आलं. दरम्यान, येथील मेळाव्यात माजी मंत्री आणि मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनीही भाषण केलं. यावेळी, सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी मिरज विधानसभेचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा करण्यात आला. त्यामुळे, आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, मिरज मतदारसंघ हा मुस्लीम बहुल मतदारसंघ असून येथे मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे.
जे ह्रदयात आहे, त्याला जागृत करण्यासाठी, चालना देण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला. निसटता पराभव आपल्या पदरी पडला, काही मतं कमी पडली. पण, विधानसभा निवडणुकांवेळी बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर सगळा हिंदू एकत्र झाला आणि विधानसभेचा निकाल भरभराटीने दिसून आला. आज सभागृहात एवढीच गल्ली त्यांच्यासाठी राहिलीय, बाकी सगळं सभागृह आपलं आहे. आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे, त्यामुळे आम्ही मागे नाही. आम्हीपण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो. मी मिनी पाकिस्तानमधून चारवेळा चौकार मारत आमदार झालो आहे, असे माजी मंत्री व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी म्हटलंय. त्यामुळे मिरज विधानसभेचा आमदार सुरेश खाडे यांनी मिनी पाकिस्तान असा उल्लेख केलाय. बटेंगे तो कटेंगे या नाऱ्या भोवती सर्व हिंदू विधानसभेमध्ये एकत्र झाल्याचे सांगताना एक साथ रहेंगे तो टिकेंगे असे देखील सुरेश खाडे यांनी म्हटले.
नितेश राणेंची विशाल पाटलांवर टीका
सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत, ते कसे सुरु आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणं गरजेचं होतं. परंतु मी फाटक्या तोंडाचा आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणूनच, माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले, असे म्हणत नितेश राणेंनी विशाल पाटील यांना लक्ष्य केलं. जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्माला देखील लागला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, अशा शब्दात राणेंनी भाषणातून आपली भूमिका मांडली.
हेही वाचा