Delhi Assembly Elections 2025 : 6 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी एकजूट दाखवली. सर्व पक्षांनी एकत्रित निवडणूक लढत भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळवण्यापासून रोखण्यात यश मिळवलं. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एकत्रित लढणाऱ्या इंडिया आघाडीत आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फुट पडल्याचं पाहायला मिळतंय आहे. काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेसनेही अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील स्थावर मालमत्तेचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी काँग्रेस आणि आपमध्ये संघर्ष पेटलाय.
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांचा केजरीवालांना पाठिंबा
दिल्लीची विधानसभा निवडणूक आता महिन्यावर येऊन ठेपलीये. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्ष देखील या निवडणुकीत ताकदीने उतरणार आहे. मात्र, दुसरीकडे काँग्रेस आणि आपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दुरावा निर्माण झालाय. काँग्रेसने आपची साथ सोडली असली तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केलाय.
अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्र सहकारी असलेल्या आतिशी यांच्यावर सोपवली होती. मात्र, आतिशी यांच्याकडे जबाबदारी सोपवत असताना केजरीवाल यांनी मी भ्रष्ट आहे की नाही? याबाबतचा निर्णय दिल्लीतील जनता घेईल, असं आश्वासनही दिलं होतं. त्यामुळे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणाऱ्या केजरीवालांसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण असणार आहे.
अरविंद केजरीवालांना आत्तापर्यंत कोणती आश्वासने दिली?
दिल्लीत गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे, अशा परिस्थितीत दिल्लीकरांची सुरक्षा ही आमची सर्वात मोठी प्राथमिकता असणार आहे. आमचे सरकार स्थापन झाल्यास दिल्लीतील सर्व आरडब्ल्यूएला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी सरकारकडून निधी दिला जाईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या