England Squad WC 2023 : अष्टपैलूंचा भरणा, तगडे फलंदाज, धारदार गोलंदाज, विश्वचषकासाठी इंग्लंडने संभाव्य संघ निवडला!
England Squad WC 2023 : विश्वचषकासाठी इंग्लंडने निवडला संभाव्य संघ, बेन स्टोक्सला संधी, जोफ्रा आर्चरचा पत्ता कट
England confirms provisional World Cup squad : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी राहिलाय. प्रत्येक संघांनी तयारी सुरु केली आहे. ऑस्ट्रेलियानंतर आता इंग्लंडनेही विश्वचषकासाठी आपला संभाव्या संघ जाहीर केलाय. इंग्लंडच्या संघात बेन स्टोक्सचे पुनरागमन झालेय. तर जोफ्रा आर्चर आणि हॅरी ब्रूक यांना संधी मिळालेली नाही.
विश्वचषकासाठी निवडेलेल्या इंग्लंडच्या संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. त्याशिवाय तगडे फलंदाज आणि धारधार गोलंदाजांना संघात स्थान दिलेय. गतविजेता इंग्लंडचा संघ संतुलित दिसत आहे. जोस बटलरच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या मैदानात उतरणार आहे. इंग्लंडच्या संघात मोईन अली, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यासारख्या अष्टपैलूंचा भरणार आहे. जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यासारखे तगडे फलंदाज आहे. डेविड मलान, जो रुट आणि जेसन रॉय यांचाही समावेश आहे. रासी टोपली, डेविड विली आणि मार्क वूड यांच्यासारखे भेदक गोलंदाज संघात आहेत.
इंग्लंडच्या संघात कोण कोणते शिलेदार ? England's provisional squad for the World Cup :
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिंगसन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपली, डेविड विली, मार्क वुड आणि क्रिस वॉक्स
Jos Buttler (captain), Moeen Ali, Gus Atkinson, Jonny Bairstow, Sam Curran, Liam Livingstone, Dawid Malan, Adil Rashid, Joe Root, Jason Roy, Ben Stokes, Reece Topley, David Willey, Mark Wood, Chris Woakes.
🚨 BREAKING: England have named their provisional 15-member squad for the @cricketworldcup 2023, with a few surprise selections 📝
— ICC (@ICC) August 16, 2023
Details 👇https://t.co/R8OaRRnZu8
स्टोक्सची निवत्ती मागे
इग्लंड व्यवस्थापकांच्या विनंतीनंतर अष्टपैलू बेन स्टोक्स याने एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतली आहे. आयसीसीने याबाबतचे वृत्त दिलेय. विश्वचषकाआधी इंग्लंडचा संघ न्यूझीलंडविरोधात वनडे मालिका खेळणार आहे. बेन स्टोक्स न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या मालिकेपासून वनडे मध्ये पुनरागमन करणार आहे.
विश्वचषक कधीपासून -
भारतात होणारा विश्वचषकाचा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत.