विराट कोहलीची कर्णधार म्हणून कामगिरी चांगली, पण आयुष्यभर 'या' गोष्टीचे राहणार शल्य
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 19 एकदिवसीय मालिकांमध्ये सहभाग घेतला. यात संघाने चांगली कामगीरी केली.
मुंबई : रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचा नविन कप्तान झाला आहे. त्याच्याकडे एकदिवसीय आणि टी-20 ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर विराट कोहली ( Virat kohli ) अजूनही कसोटी संघाचा कर्णधार आहे. कोहलीने कप्तान पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर रोहित शर्माला नवा कर्णधार करण्यात आले. कर्णधार म्हणून विराट कोहलीने अत्यंत चागंली कामगिरी केली आहे.
कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाचा विक्रम
विराट कोहलीकडे 2017 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व गेले. तेव्हापासून आतापर्यंत 95 एकदिवसीय सामने खेळण्यात आले. त्यातील 65 सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय प्राप्त करता आला तर 27 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. यात घरच्या मैदानावर 35 सामने खेळण्यात आले. त्यातील 24 सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला तर 11 सामन्यात पराभव झाला. यासोबतच विदेशात कोहलीच्या नेतृत्वात खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली. विदेशी देशांमध्ये कोहलीच्या नेतृत्वात 42 एकदिवसीय सामने खेळण्यात आले. यातील 29 सामन्यांमध्ये भारीतय संघाला विजय मिळाला तर 11 सामन्यांमध्ये पराभव झाला.
एवढ्या एकदिवसीय सामन्यात भारताला दिला विजय मिळवून
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने 19 एकदिवसीय मालिकांमध्ये सहभाग घेतला. यात संघाने चांगली कामगीरी केली. 19 मधील 15 मालिका भारताने आपल्या नावे केल्या. यामुळेच भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून विराट कोहलीकडे पाहिले जावू लागले.
आयसीसी मालिकेत अयशस्वी
विरोट कोहलीने एकदिवसीय सामन्यांमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले असले तरी आयसीसीच्या मालिकांमध्ये त्याला एकदाही यशस्वी होता आलं नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये भारतीय संघाला चॅम्पियन चषकाच्या फायनल सामन्यात पराभावाच धक्का बसला. याशिवाय 2019 मध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाला सेमीफायनलपासून परत यावे लागले. 2013-14 मध्येही महेंद्र सिंग धोनीच्या गैरहजेरीत कोहलीला कर्णधार करण्यात आले होते. परंतु, तेथेही त्याची कामगिरी खराब राहिली. त्यामुळे कोणताच आयसीसी चषक जिंकता आला नाही याचे शल्य त्याच्या मनात कायम राहिल.
संबंधित बातम्या
वनडेमधील नेतृत्वाच्या 'विराट' युगाचा शेवट, पाहा चार वर्षात कोहलीनं काय कमावलं?
Team India Announced : विराट कोहली-अजिंक्य रहाणेला मोठा धक्का
Virat Anushka Daughter Vamika : विराट कोहलीसोबतची चिमुकली कोण? फोटो व्हायरल... ही वामिका तर नाही ना?