NZ vs IND 1st T20: पावसाचा खोळंबा! भारत- न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्याच्या नाणेफेकीला उशीर
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना वेलिंग्टनच्या (Wellington) स्कॉय स्टेडियमवर (Sky Stadium) खेळला जाणार आहे.
NZ vs IND 1st T20: भारत आणि न्यूझीलंड (New Zealand vs India) यांच्यात आज वेलिंग्टनच्या (Wellington) स्कॉय स्टेडियमवर (Sky Stadium) खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात पावसानं व्यत्यय आणलंय. पावसामुळं या सामन्यातील नाणेफेकीला उशीर झाल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलीय.
बीसीसीआयचं ट्वीट-
Toss at Sky Stadium, Wellington has been delayed due to persistent rains.
— BCCI (@BCCI) November 18, 2022
Stay tuned for further updates.#NZvIND pic.twitter.com/e2QJYdAnRN
हवामानाचा अंदाज
हवामानाच्या ताज्या अपडेटनुसार, वेलिंग्टनमध्ये आज ढगाळ वातावरण असेल आणि संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचीही मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवली जातेय. दुपारनंतर पाऊसासह वारा वाहण्याची शक्यता आहे. पाऊस आणि हवामानातील आर्द्रता यामुळं तापमानही 14 अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकतं. यामुळं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
भारताचा न्यूझीलंड दौरा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 13 दिवसांत 6 सामने खेळले जातील, ज्यात तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना आज 18 नोव्हेंबर रोजी वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा टी-20 सामना 20 नोव्हेंबर आणि तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे माउंट मॉन्गनुई आणि नॅपियर येथे खेळला जाईल. दरम्यान, एकदिवसीय मालिकेला 25 नोव्हेंबर ईडन पार्क येथे होईल. त्यानंतर दुसरा एकदिवसीय सामना 27 नोव्हेंबर रोजी सीडन पार्क आणि तिसरा एकदिवसीय साममना 30 नोव्हेंबर रोजी हेग्ले ओवल येथे पार पडणार आहे. या दौऱ्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसह सात वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय.
संभाव्य संघ
न्यूझीलंड:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.
भारत:
शुभमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, दीपक हुडा/वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
हे देखील वाचा-