(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video : क्रिकेटचे मैदान आहे की गावाचा उरूस... Nz vs Eng कसोटी सामन्यात घडली अनोखी घटना, LIVE मॅचमध्ये चाहते खेळले क्रिकेट
आज जरी चाहते टी-20 क्रिकेट पाहण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक असले तरी एक काळ असा होता, जेव्हा फक्त कसोटी क्रिकेट खेळले जायचे आणि स्टेडियम पूर्णपणे भरले जायचे.
New Zealand vs England 1st Test : क्रिकेटच्या तीन फॉरमॅटमध्ये कसोटी हा सर्वात जुना फॉरमॅट आहे. आज जरी चाहते टी-20 क्रिकेट पाहण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक असले तरी एक काळ असा होता, जेव्हा फक्त कसोटी क्रिकेट खेळले जायचे आणि स्टेडियम पूर्णपणे भरले जायचे. पण काळ बदलला आणि कसोटी क्रिकेटची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली. कसोटी क्रिकेट आज टी-20 क्रिकेटइतके लोकप्रिय नसेल, परंतु चाहते अजूनही दोन मोठ्या संघांमध्ये खेळला जाणारा कसोटी सामना पाहण्याची संधी सोडत नाहीत. त्यामुळेच कसोटी क्रिकेट पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहे.
सध्या दोन मोठ्या कसोटी मालिका खेळल्या जात आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. त्याच वेळी, इंग्लंड संघ 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या न्यूझीलंडच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 8 गडी गमावून 319 धावा केल्या आहेत. पण लंच ब्रेकदरम्यान, सामन्यात एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले.
Day 1 ✅
— England Cricket (@englandcricket) November 28, 2024
Four wickets from Shoaib Bashir gives us a strong platform to build on in Christchurch 🙌 pic.twitter.com/AujytqJaK1
खरंतर, 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवशी लंच ब्रेक झाल्यानंतर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मैदानात जाण्याची परवानगी देण्यात आली. ही सुवर्णसंधी मिळताच काही वेळातच शेकडो प्रेक्षकांनी संपूर्ण मैदान भरले. यावेळी अनेक प्रेक्षक सेल्फी घेऊ लागले तर अनेकांनी मैदानात स्वतःचे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. काही काळ असे वाटले की, हे मैदान कसोटी सामन्यासाठी नाही तर लोकांच्या सहलीसाठी तयार केले आहे.
इंग्लंड क्रिकेटने केला व्हिडिओ
या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर एका मनोरंजक कॅप्शनसह शेअर केला आहे. इंग्लंड क्रिकेटने लिहिले - लंच ब्रेक दरम्यान चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी देण्यासाठी हॅगली ओव्हलकडून एक उत्कृष्ट प्रयत्न.
A lovely touch from the Hagley Oval allowing fans onto the pitch during the lunch break ❤️ pic.twitter.com/LEhlEEsSIK
— England Cricket (@englandcricket) November 28, 2024
हे ही वाचा -