New Zealand vs Pakistan Warm Up Match : भारतात येताच मोहम्मद रिजवानचा धमाका, न्यूजीलंडविरुद्धाच्या सामन्यात शतकाची कामगिरी
New Zealand vs Pakistan Warm Up Match : हैदराबादमध्ये खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यात पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने दरमदार शतक झळकावले.
मुंबई : पाकिस्तानच्या (Pakistan) क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक तसेच फलंदाज असेलेल्या मोहम्मद रिझवानने न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand ) सामन्यात दमदार शतक ठोकलं. भारतात सुरु असलेल्या सराव सामन्यादरम्यान त्यांने ही कामगिरी केलीये. दरम्यान रिझवानने न्यूझीलंडविरुद्ध 92 चेंडूत शतक पूर्ण केले. रिझवान पहिल्यांदाच क्रिकेट सामन्यासाठी भारतात आला आहे आणि त्याने भारतातील त्याच्या पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली. आशिया चषकातील (Asia Cup) रिझवानची कामगिरी ही फारशी काही खास ठरली नाही. त्यामुळे त्याने झळकावलेले हे शतक हे आगामी विश्वचषक (World Cup) स्पर्धेसाठी रिझवानसाठी आणि पाकिस्तान संघासाठी महत्त्वाचं असल्याचं सध्या म्हटलं जात आहे.
रिझवान जेव्हा मैदानात उतरला तेव्हा पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट होती. इमाद वसीम आणि अब्दुल्ला शफीक यांना न्यूझीलंडच्या खेळाडूंनी लवकर माघारी धाडले. मात्र रिझवानने कर्णधार बाबर आझमच्या साथीने पाकिस्तानची धुरा सांभाळली. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 114 धावांची भागीदारी केली आणि न्यूझीलंडला चोख प्रत्युत्तर दिले. सुरुवातील रिझवानला स्थिरावण्यासाठी बराच अवधी लागला. पण त्यानंतर त्याने स्वीप शॉट्सच्या जोरावर शतकाची कामगिरी केली.
बाबर आणि रिझवानची कामगिरी
बाबर आणि रिझवान यांनी केवळ 59 चेंडूंमध्ये पन्नास धावांची भागीदारी केली. त्यानंतर त्यांनी 97 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला. बाबरनेही या भागीदारामध्ये रिझवानला मोलाची साथ दिली. बाबरने 80 धावांची खेळी केली. बाबरचे शतक अगदी थोडक्यात हुकले पण रिझवानने त्याचे शतक झळकावले. दरम्यान शतक झळकाल्यानंतर रिझवान निवृत्त झाला. इतर फलंदाजांना सामन्यात खेळण्याची संधी देण्यासाठी त्याने त्याची निवृत्ती धोषित केली.
पाकिस्तानची परिस्थिती नाजूकच
दरम्यान या सामन्यमध्ये जरी रिझवान आणि बाबरने उत्कृष्ट कामगिरी केली असली तरीही पाकिस्तानची अवस्था अजूनही नाजूकच आहे. खरतर पाकिस्तानची सलामीची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळली जात नसल्याचं यामागे महत्त्वाचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान फखर जमानची कामगिरी चांगली ठरत नसल्यामुळे संघात अब्दुल्ला शफीक आणण्यात आले. पण सराव सामान्यात त्याच्याकडूनही पाकिस्तान संघाच्या पदरी निराशाच पडली. पण इमाम उल हकची गोलंदाजी ही संघासाठी काहीशी सकारात्मक ठरल्याचं पाहायला मिळालं. पण जर पाकिस्तानची परिस्थिती अशीच राहिली तर विश्वचषकादरम्यान बाबर आणि रिझवान या दोघांवर जास्त दबाब निर्माण होईल.दरम्यान यामुळे पाकिस्तानची परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याची चिन्हं यामुळे निर्माण होत आहेत.
विश्वचषकाआधी सराव सामन्यांची मालिका सुरु झाली असून शुक्रवार (29 सप्टेंबर) रोजी हैदराबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने 345 धावा करत न्यूझीलंडसमोर धावांचा डोंगर उभारलाय.