एक्स्प्लोर

Ranji Trophy Final : मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात, 42 व्या जेतेपदावर नाव कोरलं!

Ranji Cup 2024: मुंबईच्या धुरंधरांनी धडाकेबाज कामगिरी करत विदर्भावर मात केली आणि 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरलं.

Mumbai vs Vidarbha Ranji Trophy Final : मुंबई : रणजी चषकाच्या (Ranji Cup 2024) अंतिम सामन्यात विदर्भ संघावर विजय मिळवून, अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) मुंबई संघानं चषकावर नाव कोरलं. मुंबईनं (Mumbai) विदर्भाच्या (Vidarbha) संघाचा 169 धावांनी पराभूत करत 42 व्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. मुंबईनं दिलेल्या 538 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ 368 धावांवर ढेपाळला. विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी ठरली. 

आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर विदर्भचा कर्णधार अक्षय वाडकरनं (Akshay Wadkar) झुंजार शतकी खेळी करुन डाव सावरला. त्याला हर्ष दुबेनं (Harsh Dubey) 65 धावा करुन भरभक्कम साथ दिली. उपहारापर्यंत 5 बाद  333 अशी भक्कम मजल विदर्भने मारली होती, पण उपहारानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी गिअर बदलून धडाधड विकेट काढल्या. त्यामुळे मुंबईचा विजय सुकर झालं. अक्षय वाडकरने झुंजार 102 तर हर्ष दुबेने 65 धावांची चिवट खेळी.

विदर्भची अवस्था 5 बाद 333 वरुन 8 बाद 356

उपहारानंतर 5 बाद  333 वरुन विदर्भने खेळाला सुरुवात केली. मात्र तनुश कोटियनने अक्षय वाडकरला पायचित करुन मुंबईने विजयाच्या दिशेने कूच केली. यानंतर मग तुषार देशपांडेने हर्ष दुबे आणि आदित्य सरवटे यांना बाद करुन विदर्भला आणखी  धक्के दिले. त्यामुळे विदर्भची अवस्था 5 बाद 333 वरुन 8 बाद 356 अशी झाली. यानंतर मग कोटियनने यश ठाकूरला तर धवल कुलकर्णीने उमेश यादवला बाद करुन विदर्भचा दुसरा डाव 368 धावांवर संपुष्टात आणला. मुंबईकडून तनुष कोटियने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर तुषार देशपांडे आणि शतकवीर मुशीर खानला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.

42 व्यादां जेतेपदावर मुंबईचं नाव

दरम्यान, मुंबईने आजच्या विजयासह   42 व्या जेतेपदावर नाव कोरलं. 2015-16 नंतर मुंबईने मिळवलेला हा पहिला विजय आहे. 

वानखेडेवर फायनलचा थरार

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध विदर्भ असा फायनलचा थरार रंगला. रणजी करंडकाची फायनल चौथ्या दिवसअखेर यजमान मुंबईच्या बाजूनं झुकली होती. या सामन्यात विदर्भानं चौथ्या दिवसअखेर पाच बाद 248 धावांची मजल मारली होती. त्यामुळं विदर्भासमोर विजयासाठी पाचव्या आणि अखेरच्या दिवशी 290 धावांचं कठीण आव्हान होतं. त्या तुलनेत मुंबई विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर होती. आज मुंबईने विदर्भचे 5 फलंदाज तंबूत धाडून विजय मिळवला.

या सामन्यात मुंबईनं विदर्भाला विजयासाठी 538 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या करुण नायर आणि कर्णधार अक्षय वाडकरनं झुंजार फलंदाजी केली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. करुण नायरनं 74 धावांची, तर अक्षय वाडकरनं नाबाद 102 धावांची खेळी उभारली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
Embed widget