MI vs RCB WPL 2025 : RCBच्या विजयी रथाला लागला ब्रेक! शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामना मुंबई इंडियन्सचा विजय, कर्णधार हरमनप्रीत चमकली
महिला प्रीमियर लीगच्या (WPL) तिसऱ्या हंगामात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिला पराभव पत्करावा लागला आहे.

Mumbai Indians beats Royal Challengers Bengaluru : महिला प्रीमियर लीगच्या (WPL) तिसऱ्या हंगामात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पहिला पराभव पत्करावा लागला आहे. सलग दोन विजयानंतर अखेर आरसीबीच्या विजयी रथाला ब्रेक लागला. गतविजेत्या बंगळुरूला त्यांच्या तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
बंगळुरूच्या होमग्राउंड एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने बंगळुरूचा 4 गडी राखून पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौरची स्फोटक अर्धशतक आणि नॅट सायव्हर-ब्रंटची वादळी खेळी यांनी मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु 16 वर्षीय जी कमलिनीने शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
A superb chase as Mumbai Indians secure their 2️⃣nd win in a row! 🙌 🙌
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 21, 2025
The Harmanpreet Kaur-led unit bag 2️⃣ points as they beat #RCB by 4 wickets! 👏 👏
Scorecard ▶ https://t.co/WIQXj6JCt2 #TATAWPL | #RCBvMI | @mipaltan pic.twitter.com/NfA75uQzK3
बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बंगळुरूची सुरुवात धमाकेदार झाली. संघाची कर्णधार स्मृती मानधना मैदानात येताच तिने चौकार आणि षटकार मारण्यास सुरुवात केली आणि तिसऱ्या षटकापर्यंत तिने संघाला 30 धावांच्या जवळ नेले होते. पण तीही त्याच षटकात बाद झाली, तर दुसरा सलामीवीर डॅनी वायट-हॉज यावेळी काही खास करू शकली नाही. पण ऑस्ट्रेलियाची महान अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीने तिसऱ्या क्रमांकावर येताच चौकार आणि षटकारांचा वर्षाव सुरू केला.
दुसरीकडे, विकेट पडत राहिल्या पण पेरीने फक्त 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पेरी आणि रिचा घोष यांच्यात 50 धावांची भागीदारी झाली. पण शेवटी, ऑस्ट्रेलियन अनुभवी खेळाडूने एकट्याने धावा केल्या आणि संघाला 167 धावांच्या मजबूत धावसंख्येपर्यंत पोहोचवले. पेरीने फक्त 43 चेंडूत 81 धावा (11 चौकार, 2 षटकार) केल्या. मुंबईकडून अमनजोत कौरने 3 विकेट्स घेतल्या.
कर्णधार हरमनप्रीत चमकली
168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने 82 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर, हरमनप्रीत आणि अमनजोत यांच्यात 62 धावांची अतिशय महत्त्वाची भागीदारी झाली. हरमनप्रीत 50 धावा करून बाद झाली, पण अमनजोत 34 धावा करून शेवटपर्यंत नाबाद राहिला. गेल्या महिन्यात भारताच्या 19 वर्षांखालील महिला टी-20 वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कमलिनीने दबावाखाली एक उत्कृष्ट चौकार मारून तिच्या संघाला 4 गडी राखून विजय मिळवून दिला. 3 सामन्यांपैकी 2 विजयानंतर, आरसीबी अजूनही पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे, तर मुंबई दुसऱ्या स्थानावर आली आहे.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
