IND vs NZ Live Updates: तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला, न्यूझीलंडला विजयासाठी 400 धावांची गरज

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलँड दरम्यान आजपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी वानखेडे स्टेडिअमवर सुरू आहे.

abp majha web team Last Updated: 05 Dec 2021 05:26 PM
न्यूझीलंडला विजयासाठी 400 धावांची गरज

तिसऱ्या दिवशीचा खेळ अखेर संपला आहे. दिवस अखेर न्यूझीलंडने 5 गडी गमावले असून त्यांनी 140 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजूनही 400 धावांची गरज आहे.

भारताचा डाव घोषित, न्यूझीलंडसमोर 539 धावांचा डोंगर

मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीवर भारताचं वर्चस्व दिसत आहे. भारतीय संघानं डाव घोषित केला असून न्यूझीलंडच्यासमोर 539 धावांचं डोंगर उभा केलंय.

भारताला चौथा झटका, श्रेयस अय्यर बाद
न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात भारताला चौथा झटका लागलाय. श्रेयस अय्यर 14 धावा करून बाद झालाय.

 

भारताला दुसरा धक्का, चेतेश्वर पुजारा 47 धावांवर बाद

भारताला दुसरा धक्का बसला आहे. चेतेश्वर पुजारा 47 धावांवर बाद झाला आहे. एजाज पटेलने पुजाराला तंबूत धाडले आहे. एजाजने मयांकलाही बाद केले. 

अर्धशतकी खेळीनंतर मयांक अग्रवाल बाद

भारताला दुसऱ्या डावात पहिला धक्का बसला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल 62 धावांवर बाद झाला आहे. मयांकने आपल्या खेळीत 9 चौकार आणि एक षटकार लगावला. भारताकडे 350 धावांची आघाडी आहे. 

मुंबई कसोटीवर भारताची पकड, दुसऱ्या दिवसाखेर विराटसेनेकडे 332 धावांची आघाडी

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडचा डाव अवघ्या 62 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंड संघाला फक्त 62 धावांवर गारद केल्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाकडे 263 धावांची विशाल आघाडी घेतलीय.


 

दुसऱ्या डावात भारताची संयमी खेळी

दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारतानं न्यूझीलंडला अवघ्या 62 धावांवर गुंडाळलं. यानंतर दुसऱ्या डावात भारताकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या  सलामीवीर चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल संयमी खेळी करताना दिसत आहेत. भारताचा स्कोर- 39/0 (13 ओव्हर)

टीम इंडियाची भेदक गोलंदाजी, न्यूझीलंडचा संपूर्ण संघाचा डाव अवघ्या 62 धावांवर गुंडाळला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा संपूर्ण संघाचा डाव अवघ्या 62 धावांवर गुंडाळला आहे. 

वानखेडेच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांची कमाल, न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत 

वानखेडेच्या मैदानावर भारतीय गोलंदाजाच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा संघ डगमताना दिसत आहे. भारतानं आतापर्यंत न्यूझीलंडच्या 5 फलंदाजाला बाद केले आहे. 

भारताची आक्रमक सुरुवात, न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज बाद

भारताच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं संघाला चांगली सुरुवात करून दिलीय. मोहम्मद सिराजनं न्यूझीलंडच्या सलामीवीरांना माघारी धाडलंय.

एजाज पटेलचा विश्वविक्रम, मुंबई कसोटीत घेतल्या दहा विकेट्स, अनिल कुंबळेंच्या विक्रमाशी बरोबरी

एजाज पटेलचा विश्वविक्रम, मुंबई कसोटीत घेतल्या दहा विकेट्स, अनिल कुंबळेंच्या विक्रमाशी बरोबरी

झुंझार खेळी करणारा मयांक अग्रवाल 150 वर बाद

मयांक अग्रवाल झुंझार खेळी करून 150 वर बाद झालाय. एजाज पटलेनं सात विकेट्स घेतले आहेत. 

पहिल्या दिवशीचा डाव आटोपला, भारत 221/4

पहिल्या दिवशी भारताने चांगली सुरुवात करुनही न्यूझीलंडच्या अजाजच्या फिरकीमुळे भारताचे दिग्गज तंबूत परतले. पण मयांकने ठोकलेल्या शतकामुळे दिवसअखेर भारताने 4 विकेट्स गमावत 221 धावा केल्या आहेत.

मयांकचं संयमी शतक

एकीकडे भारताची फलंदाजी ढासळत असताना सलामीवीर मयांक अगरवालने एकहाती फलंदाजीची धुरा सांभाळत शतक पूर्ण केलं आहे. 196 चेंडूत मयांकने 13 चौकार आणि 3 षटकार ठोकत शतक पूर्ण केलं आहे.


 

अजाजने टीपला चौथा बळी

न्यूझीलंडच्या अजाज पटेलने श्रेयस अय्यरला माघारी धाडल्याने भारताचे 4 गडी तंबूत परतले आहेत. सध्या अगरवाल आणि साहा फलंदाजी करत आहेत.

चहापानापूर्वी भारत 111 धावांवर 3 बाद

भारतीय संघासाठी आजच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली होती. पण सलामीवीर शुभमन गिल बाद होताच पुजारा आणि कोहली हे दोघेही शून्यावर तंबूत परतल्याने भारताची अवस्था काहीशी बिकट झाली आहे. चहापानाचा ब्रेक झाला असून 37 ओव्हरनंतर भारताची अवस्था 111 धावांवर 3 बाद अशी आहे.

मयांकचं अर्धशतक पूर्ण

एकीकडे भारताचे दिग्गज फलंदाज तंबूत परतत असताना सलामीवीर मयांक अगरवाल टीकून खेळत आहे. त्याने नुकतंच अर्धशतक पूर्ण केलं असून त्याच्या जोडीला श्रेयस अय्यर उभा आहे.

भारताची स्थिती बिकट, विराट कोहलीही शून्यावर बाद

न्यूझीलंडचा अजाज पटेल भारतीय फलंदाजाचा कर्दनकाळ ठरताना दिसत आहे. गिल, पुजारानंतर आता त्याने भारताचा कर्णधार विराटलाही पायचीत करत शून्यावर तंबूत धाडलं आहे.

चेतेश्वर आजही 'फेल', खातं न खोलताच तंबूत परत

अनेक संधी दिल्यानंतरही भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हवी तशी कामगिरी करत नाही. आजतर तो शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे त्याच्या पुढील प्रवासावर प्रश्नच निर्माण झाला आहे. अजाजनेच ही देखी विकेट घेत 80 धावांवर भारताला 2 झटके दिले आहेत.

शुभमनचं अर्धशतक हुकलं, 44 धावा करुन बाद

भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने संघाला उत्तम सुरुवात करुन दिली. मात्र अजाज पटेलच्या एका फिरकीवर त्याची विकेट पडली आहे. गिल 44 धावा करुन तंबूत परतला आहे.

गिल-अगरवालकडून चांगली सुरुवात

भारतीय सलामीवर शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांनी चांगली सुरुवात केली आहे. 22 ओव्हर्सनंतर भारताचा स्कोर 64 आहे.

भारताची सावध सुरुवात

नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडल्यानंतर भारताचे सलामीवीर शुभमन गिल आणि मयांक अगरवाल मैदानात आले आहेत. 6 षटकानंतर भारताचा स्कोर 25 धावा इतका आहे.

भारताने नाणेफेक जिंकली; प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करणार आहे. 

कसोटी सामन्यास 12 वाजता सुरुवात, 78 षटकांचा होणार खेळ

दुसऱ्या कसोटी सामन्याची नाणेफेक 11.30 वाजता होणार असून 12 वाजता सामना सुरू होईल. आज पहिल्या दिवशी 78 षटकांचा खेळ होणार आहे. 


 





भारताला मोठा धक्का; अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा यांना दुखापत; कसोटी सामन्यातून बाहेर

दुसरा कसोटी सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मा हे दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. बीसीसीयाआयने याची माहिती दिली आहे. 





पार्श्वभूमी

India vs New Zealand 2nd Test: भारत आणि न्यूझीलँड दरम्यान आजपासून दुसरा आणि अखेरचा कसोटी वानखेडे स्टेडिअमवर सुरू होत आहे. मुंबईतील बदललेले वातावरण पाहता टीम इंडिया आपल्या संघात बदल करण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यावर पावसाचे सावट आहे. तब्बल पाच वर्षानंतर मुंबईत कसोटी सामना होणार आहे. कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर स्टेडिअममध्ये क्षमतेच्या 25 टक्केच प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. सामना सुरू उशिराने सुरू होणार. नाणेफेक 11.30 होणार असून दुपारी बारा वाजता सामना सुरू होणार आहे. 


विराट कोहलीचे कमबॅक


कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणे याने संघाचे नेतृत्व केले होते. भारतीय संघात विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे संघाची धुरा विराह कोहलीकडे जाणार आहे. तर, अजिंक्य रहाणे संघाचा उपकर्णधार असणार आहे. कोहलीशिवाय भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही संधी मिळू शकते. 


नवीन खेळाडूचे पदार्पण


भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने कानपूर कसोटीत दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. मात्र, जखमी असल्याने त्याने यष्टिरक्षण केले नव्हते. त्याच्या ऐवजी के.एस. भरत याने दोन्ही डावात यष्टिरक्षण केले होते. त्याची कामगिरीही चांगली होती. त्यामुळे भारतीय संघाकडून आज के.एस. भरत पदार्पण करू शकतो. 


दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य टीम इंडिया: 


विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, के. एस. भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.


इतर महत्त्वाच्या बातम्या:


Mumbai Women Cricket Scorer : मुंबई कसोटीत स्कोरिंगची सूत्रं 'ती'च्या हाती

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.