Ind vs NZ 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्य़ात विराट कोहली शून्य धावावर बाद झाला. पण विराट कोहली बाद होता का? याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेय. कर्णधार विराट कोहलीला शून्य धावसंख्येवर अंपायरने बाद दिलं. विराट कोहलीनं क्षणाचाही विलंब न घेता तिसऱ्या पंचांची मदत घेतली. मात्र, तिसऱ्या पंचांनीही विराट कोहलीला बाद दिलं. हा निर्णय वादग्रस्त ठरला असून सोशल मीडियावर पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलच्या चेंडूवर विराट एकही धाव न काढता तंबूत परतला. या निर्णायावरुन सोशल मीडियात नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाद दिल्यानंतर विराट कोहलीलाही राग अनावर झाला. मैदानाबाहेर जाताना विराट कोहलीनं सिमारेषावर जोरानं बॅट मारत आपली नाराजी व्यक्त केली.
सोशल मीडियावरील व्हिडीओत विराट कोहली बाद नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. चेंडू विराट कोहलीच्या बॅटची कड घेऊन गेल्याचं दिसत आहे, असं असतानाही विराट कोहलीला अंपायरने बाद दिल्यामुळे नवीन वाद सुरु झालाय. भारतीय संघाची फलंदाजी सुरु असाताना 30 व्या षटकांतील अखेरच्या चेडूवर कोहलीला बाद दिलं. टिव्ही रिटेकमध्ये पाहिल्यानंतर स्पष्ट दिसतेय की, चेंडू आधी विराट कोहलीच्या बॅटला लागलेला. त्यानंतर चेंडू विराटच्या पॅडला लागतो. तरीही अंपायरने विराट कोहलीला बाद दिलं. अंपायरच्या या निर्णायावर सर्वांनाच धक्का बसला. समालोचकांनी या निर्णायावर आश्चर्य व्यक्त केलं. बाद दिल्यानंतर विराट कोहलीने पंच अनिल चौधरी यांच्याकडे दाद मागितली. दोघांमध्ये थोडावेळ चर्चा झाली. तिसऱ्या पंचांनीही विराटला बाद दिलं. त्यानंतर विराट कोहलीने मैदान सोडलं. पण मैदान सोडतानाही विराटची नाराजी स्पष्ट दिसत होती. दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीने चार चेंडूचा सामना केला. मात्र, एकही धाव काढण्यात तो अपयशी ठरला.
दोन दिवसांत मुंबई कोसळणाऱ्या पावसामुळे दुसरा कसोटी सामना उशीराने सुरु झाला. विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामी फलंदाज शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल यांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली. एजाज पटेल यान गिलला बाद करत न्यूझीलंडला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर लोगापाठ दोन विकेट गेल्या. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली स्वस्तात बाद झाले. 80 धावांवर भारताचे तीन फलंदाज माघारी गेले. सलामी फलंदाज मयांक अग्रवाल यानं संयमी फलंदाजी करत भारताचा डाव सावरला आहे. पहिल्या कसोटीतील शतकवीर अय्यरला मोठी खेळी करण्यात अपयश आलं आहे. अय्यर 18 धावा काढून बाद झालाय. शुभमन गिलने 44 धावा चोपल्या. चांगल्या सुरुवातीनंतर गिलला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं आहे.