India vs New Zealand 2nd Test : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला मुंबईच्या वानखेडे मैदानात सुरुवात झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे. नाणेफेक जिंकणे भारतासाठी आनंदाची बातमी असली तरी महत्त्वाच्या 3 खेळाडूंचे संघात नसणे भारतासाठी त्रासदायक ठरु शकते. या 3 खेळाडूंमध्ये अष्टपैलू रवींद्र जाडेजा, गोलंदाज इशांत शर्मा आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांचा समावेश आहे. तिघांनाही दुखापतीमुळे सामन्यात खेळता येणार नसल्याने त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.


चारही खेळाडूंना दुखापत


पहिल्या कसोटी खेळलेले दोन्ही संघाचे मिळून 4 खेळाडू दुसऱ्या सामन्यात नसणार आहेत. यामध्ये भारताच्या इशांत शर्माला डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तर रहाणेलाही पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना पायाला दुखापत झाली होती. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जाडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. यामुळे हे तिघेही संघात नसून केन विल्यमसनच्या उजव्या हाताच्या एल्बोला दुखापत झाल्याने तोही विश्रांतीवर आहे. टॉम लॅथम त्याच्या जागी कर्णधार असणार आहे.  



भारतीय संघात बदल


तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात दुसऱ्या कसोटीत जयंत यादव, मोहम्मद सिराज यांना संधी मिळाली आहे. तर कर्णधार विराट कोहलीही संघात आला आहे. भारताची प्लेयिंग 11 खालीलप्रमाणे आहे.


विराट कोहली (कर्णधार), शुभमन गिल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा, आर. अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि  उमेश यादव


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha