Most Runs In T20 International 2021 : 2021 हे वर्ष तसं टी20 क्रिकेटसाठी खास होतं. कारण यंदा टी20 विश्वचषक मोठ्या थाटा-माटात पार पडला.  यंदा पाकिस्तान आणि बांग्लादेश या संघानी बरेच सामने
खेळले. ज्यामुळे संघातील अनेक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जावर उत्तम कामगिरी करता आली. पण टी20 क्रिकेटचा विचार करता यंदाच्या वर्षी पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने सर्वाधिक धावा केल्या. तर वर्षभरात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 धावा करणाऱ्यांच्या यादीवर एक नजर फिरवूया...


1. मोहम्मद रिजवान


पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिजवानने यंदा 26 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 74.86 च्या सरासरीने आणि 131.19 च्या स्ट्राइक रेटने 1 हजार 123 धावा बनवल्या. यावेळी त्याने तब्बल 95 चौकार आणि 38 षटकार ठोकले. रिजवानने यावेळी एका शतकासह 10 अर्धशतकंही ठोकली.


2. बाबर आजम 


रिजवान पाठोपाठ पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमनेही दमदार प्रदर्शन यंदाच्या वर्षात दाखवलं. बाबरने 2021 मध्ये 26 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 38.77 च्या सरासरीने आणि 126.55 च्या स्ट्राइक रेटने 853 धावा केल्या आहेत. बाबरने यावेळी एक शतक आणि आठ अर्धशतकं लगावली आहेत.


3. मार्टिन गप्टिल


यानंतर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज मार्टिन गप्टिलचा नंबर लागतो. त्याने 2021 मध्ये 18 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 145.49 च्या स्ट्राइक रेटने 678 धावा बनवल्या. गप्टिलने यंदा पाच अर्धशतकं लगावली. त्याने सर्वाधिक म्हणजे 41 षटकार यंदाच्या वर्षी लगावले.


4. मिशेल मार्श


ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्शने यंदाचा विश्वचषक जिंकवून देण्यात ऑस्ट्रेलिया संघाला खास योगदान दिलं. याशिवाय त्याने 21 सामन्यांत 36.88 च्या सरासरीने 627 धावा केल्या.    


5. जोस बटलर


टॉप 5 भारताचा एकही खेळाडू नसून पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज जोस बटलर याचा नंबर आहे. 2021 वर्षात बटलरने 14 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 65.44 च्या सरासरीने 589 धावा केल्या आहेत. त्याने यावेळी 49 चौकार आणि 26 षटकारही लगावले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha