एक्स्प्लोर

MPL 2023 : रत्नागिरी जेट्स संघाचा प्ले ऑफमध्ये प्रवेश     

MPL 2023 : रत्नागिरी संघाने ईगल नाशिक टायटन्स संघासोबत प्ले ऑफमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.   

MPL 2023 : महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सातव्या दिवशी धीरज फटांगरे (७०धावा), निखिल नाईक (४१धावा), प्रीतम पाटील (३३धावा) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीसह अझीम काझी (३-२९) याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघावर १२ धावांनी विजय मिळवला.   

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत ईगल नाशिक टायटन्स संघ ३ सामन्यात ३ विजयासह गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जेट्स संघाने छत्रपती संभाजी किंग्ज विरुद्ध सनसनाटी विजय मिळवत २ विजय व १ पराभवासह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली होती. आजच्या (बुधवार) या विजयामुळे रत्नागिरी संघाने ईगल नाशिक टायटन्स संघासोबत प्ले ऑफमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे.   

सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतसामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या अझीम काझीला आज फारशी फटकेबाजी करण्यात यश आले नाही. अझीम १४ धावांवर खेळत असताना नाशिकच्या इझान सय्यदने त्याला झेल बाद केले. प्रशांत सोळंकीने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यामुळे रत्नागिरी संघाने ३.३षटकात ३३ धावा असताना आपला पहिला गडी गमावला. त्यानंतर धीरज फटांगरेने संयमी खेळी करत ५१ चेंडूत ६चौकार व ४ षटकाराच्या मदतीने ७० धावांची खेळी केली. त्याला प्रीतम पाटीलने १९चेंडूत ५षटकारासह ३३ धावा काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ३३ चेंडूत ५२ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. 

नाशिकच्या आदित्य राजहंसच्या गोलंदाजीवर प्रीतम पाटील यष्टीच्या मागे बाद झाल्यावर धीरजने निखिल नाईक(४१धावा)च्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी ४४ चेंडूत ६३ धावांची भागीदारी करून संघाची धावसंख्या आणखी भक्कम केली. मोक्याच्या क्षणी समाधान पंगारेने धीरज फटांगरेला झेल बाद करून तंबूत पाठवले. त्यानंतर मागच्याच सामन्यात अफलातून खेळी करणाऱ्या दिव्यांग हिंगणेकर(नाबाद १७धावा)ने किरण चोरमले(नाबाद १८धावा)च्या साथीत ६चेंडूत २१ धावांची भागीदारी करून रत्नागिरी संघाला २०० धावांचे आव्हान उभारून दिले.

२०१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ईगल नाशिक टायटन्स संघाला २० षटकात ५ बाद १८८ धावाच करता आल्या. सलामीचा फलंदाज हर्षद खडीवाले(८धावा)ला प्रदीप दाढेने आपल्याच चेंडूवर झेल बाद केले व नाशिक संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मंदार भंडारीने ३९ चेंडूत ८चौकार व ४ षटकाराच्या साहाय्याने ७४ धावांची झुंजार खेळी केली. मंदार व राहुल त्रिपाठी या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ४७ चेंडूत ७८ धावांची भागीदारी केली. अझीम काझीने राहुलला २४ धावांवर तंबूत परत पाठवले. त्याने १ चौकार व १ षटकार मारला. त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर मंदार भंडारीला त्रिफळा बाद करून नाशिक संघाला ३ बाद १११ असे अडचणीत टाकले. विजयासाठी नाशिकला ३७ चेंडूत ७३ धावांची आवशक्यता होती. त्याचवेळी कौशल तांबेने १७ चेंडूत १चौकार व १ षटकारासह २२ धावा तर धनराज शिंदेने २३ चेंडूत २ चौकार व २षटकारासह नाबाद ४३ धावा केल्या. या जोडीने २५ चेंडूत ४३ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. शेवटच्या षटकात नाशिक संघाला ६चेंडूत २७ धावांची आवश्यकता होती. धनराज शिंदेने नाबाद ४३ धावांची लढत अपुरी ठरली व रत्नागिरी संघाने नाशिकला १८८ धावांवर रोखून १२ धावांनी विजय मिळवला.   

स्पर्धेचा सविस्तर निकाल: रत्नागिरी जेट्स: २०षटकात ४बाद २००धावा(धीरज फटांगरे ७०(५१,६x४,४x६), निखिल नाईक ४१(२८,३x४,२x६), प्रीतम पाटील ३३(१९,५x६), दिव्यांग हिंगणेकर नाबाद १७, किरण चोरमले नाबाद १८, अझीम काझी १४, समाधान पंगारे २-३२, आदित्य राजहंस १-२७) वि.वि.ईगल नाशिक टायटन्स: २०षटकात ५बाद १८८धावा (मंदार भंडारी ७४(३९,८x४,४x६), राहुल त्रिपाठी २४(२०,१x४,१x६), धनराज शिंदे नाबाद ४३(२३,२x४,३x६), कौशल तांबे २२, अझीम काझी ३-२९, प्रदीप दाढे १-२७, दिव्यांग हिंगणेकर १-२७); सामनावीर-अझीम काझी; रत्नागिरी जेट्स संघ १२ धावांनी विजयी.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget