एक्स्प्लोर

Mohammed Siraj News : गुवाहाटी एअरपोर्टवर ड्रामा! मोहम्मद सिराज 4 तास अडकला, Air India वर काढला राग, रात्री नेमकं काय घडलं?

Guwahati-Hyderabad flight cancels : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला.

Mohammed Siraj Air India Express cancels Guwahati-Hyderabad flight : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात आफ्रिकन संघाने तब्बल 408 धावांनी विजय मिळवत मालिका 2-0 ने खिशात घातली. मात्र सामना संपताच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज सोशल मीडियावर चांगलाच भडकलेला दिसला आणि त्यामागचं कारण क्रिकेटशी संबंधित नव्हतं.

फ्लाइट उड्डाणात झालेल्या विलंबामुळे भडकला सिराज

गुवाहाटी कसोटीमध्ये प्लेइंग XI चा भाग असलेला सिराज सामना संपल्यानंतर थेट हैदराबादला रवाना होणार होता. यासाठी त्याने एअर इंडिया फ्लाइट IX 2884 बुक केली होती, ज्याचे उड्डाण वेळापत्रकानुसार सायंकाळी 7:25 वाजता होते. पण, फ्लाइट वेळेवर उडाली नाही. सतत विलंब होत राहिला. 4 तास उलटून गेले तरी अपडेट नाही. एअरलाइनकडून कोणतीही ठोस माहिती देण्यात आली नाही. यामुळे वैतागलेल्या सिराजने ‘एक्स’वर पोस्ट करत चांगलाच संताप व्यक्त केला.

मोहम्मद सिराज काय म्हणाला?

सिराजने लिहिले की, “गुवाहाटी–हैदराबाद एअर इंडिया फ्लाइट IX 2884 ला 7:25 ला उड्डाण करायचे होते. पण एअरलाइनकडून कोणतेही अपडेट नाही. सतत संपर्क साधूनही योग्य कारण दिले जात नाही. चार तास झाले, प्रवासी अडकले आहेत. मी खरंच कोणालाही या फ्लाइटने प्रवास करण्याचा सल्ला देणार नाही, जोपर्यंत हे लोक ठोस पावले उचलत नाहीत.”

सिराजच्या तक्रारीनंतर एअर इंडियाची प्रतिक्रिया 

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सोशल मीडियावर विमानाच्या विलंबाबद्दल संताप व्यक्त केल्यानंतर, एअर इंडियाने त्यांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी कळवले की गुवाहाटीहून हैदराबादला जाणारी त्यांची फ्लाइट IX 2884, ऑपरेशनल कारणांमुळे रद्द करण्यात आली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की टीम इंडिया 30 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे, ज्यासाठी मोहम्मद सिराज संघाचा भाग नाही.

हे ही वाचा -

Gautam Gambhir Video : पराभव होताच गौतम गंभीरला चाहत्यांनी मैदानात घेरलं; हाय... हायचे नारे; टीम इंडियाचे खेळाडू आले धावून, मोहम्मद सिराजने जे केलं...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
गिल-पडिक्कलची 120 धावांची तुफान भागीदारी; पण चहापानाआधी कर्णधाराने सोडली साथ, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs SL 2nd TEST Devdutt Padikkal : श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...
श्रीलंकेची चूक, देवदत्त पडिक्कलचा सूड! 0 अन् 1 रनवर वाचला, मग बॅटने केला हिशोब चुकता; ठोकले सलग दुसरं धडाकेबाज शतक, पण...
Ind vs Sl 2nd Test Rishabh Pant : 3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
3 धावांवर खेळत होता ऋषभ पंत! अचानक फिजिओ मैदानात धावले अन् काही क्षणांतच घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
Karn Sharma Announces Retirement : 551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम
551 विकेट्स, 3 आयपीएल ट्रॉफी अन् अचानक निवृत्तीची घोषणा! टीम इंडियाच्या खेळाडूचा क्रिकेटला कायमचा रामराम

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Embed widget