एक्स्प्लोर

Mohammed Shami : तुफान फॉर्ममध्ये, पण दरवाजे बंदच! निवडकर्त्यांचा हट्ट की काही वेगळं?, 8 विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमी म्हणाला, 'मी काही बोललो तर राडा होईल...'

Mohammed Shami Ranji Trophy News : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) रणजी ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी करत आहे.

Mohammed Shami In Ranji Trophy : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) रणजी ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी करत आहे. शमीने अवघ्या 28 षटकांत 8 विकेट्स घेतले. याआधीच्या सामन्यातही त्याने उत्तराखंडविरुद्ध 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे शमी सातत्याने बंगालकडून दमदार कामगिरी करत असून, त्याच्या भेदक गोलंदाजीने तो निवड समितीला एक स्पष्ट संदेश देत आहे, की तो पूर्णपणे फिट आहे आणि टीम इंडियात पुनरागमनासाठी तयार आहे. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, तेथे 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मात्र, शमी या संघात नाही.

मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी अन् धमाकेदार कामगिरी (Mohammed Shami Ranji Trophy 8 Wickets)

बंगाल आणि गुजरात यांच्यातील रणजी ट्रॉफीच्या गट फेरीतील सामन्यात शमीने 8 विकेट्स घेतले. पहिल्या डावात त्याने 18.3 षटकांत 44 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावातही गुजरातचे फलंदाज शमीसमोर टिकू शकले नाहीत. त्याने दुसऱ्या डावात आणखी 5 खेळाडूंना माघारी पाठवत पाच विकेट्स घेतले. शमीच्या या तुफानी गोलंदाजीमुळे बंगालने हा सामना 141 धावांनी जिंकला.

'मी काही बोललो तर राडा होईल...'

यावेळी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बंगाल विरुद्ध गुजरात रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान आर.पी. सिंगशी बोलताना मोहम्मद शमीने कोणतेही वादग्रस्त विधान करण्याचे टाळले. हलक्याफुलक्या अंदाजात तो म्हणाला, “मी नेहमीच वादांमध्ये असतो. तुम्ही (माध्यमांनी) मला तसा गोलंदाज बनवून टाकलात. मी काही बोललो तर राडा होईल. आता काय बोलू, सोशल मीडियावर तर कोणीही काहीही बोलतं.” लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. शमीच्या अलीकडच्या चमकदार फॉर्मकडे पाहता, त्याची संघात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.

शमी अन् निवडकर्त्यांमधील तणाव

मोहम्मद शमी शेवटचा भारतासाठी आंतरराष्ट्रीय सामना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. त्यानंतर तो संघाबाहेर आहे. मुख्य निवडकर्ता अजीत आगरकर यांनी एका पत्रकार परिषदेत शमीच्या फिटनेसबद्दल विचारले असता "नो अपडेट" असे उत्तर दिले होते. त्यावर शमीने माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले की, "मी खेळण्यासाठी तयार आहे. जर मी फिट नसतो, तर रणजी ट्रॉफीमध्ये कसा खेळलो असतो?" आगरकर यांच्यापर्यंत शमीचे हे वक्तव्य पोहोचल्यावर त्यांनी सांगितले, "मला वाटतं शमी आणि मी याबद्दल बसून बोलण्याची गरज आहे." एकूणच, रणजी ट्रॉफीतील शमीच्या सातत्यपूर्ण कामगिरीने तो पुन्हा टीम इंडियात येऊ शकतो.

हे ही वाचा -

Mohammad Rizwan PCB Central Contract : पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ! खेळाडूची थेट PCB विरुद्ध बंडखोरी, केंद्रीय करारावर स्वाक्षरी करण्यास नकार, नेमकं कारण काय?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Ind vs Sl 1st Test : शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
शांत अन् बुजऱ्या स्वभावाचा अजिंक्य रहाणे रवी शास्त्रींच्या आवाजात बोलू लागला; सगळेच चाट पडले, अख्खा स्टुडिओ पाहतच राहिला, Video
Eng vs Pak 1st Test : बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
बाबर आझम OUT... पाकिस्तानकडून नव्या कर्णधाराची घोषणा; नाव ऐकून इंग्रजही चक्रावले, पहिल्या कसोटीत नवा कॅप्टन कोण?
IND vs SL 1st Test DAY-5 Live : गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज
गॉलमध्ये आज फैसला! 84/4… श्रीलंकेची हालत खराब; भारत आता विजयाच्या उंबरठ्यावर, फक्त 6 विकेट्सची गरज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget