Mohammad Shami Jaguar F Type : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज (India vs West Indies) दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध मर्यादीत षटकांचे सामने सुरु असून या सामन्यांसाठी संघातील दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामुळेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) संघात नसून तो सध्या विश्रांतीवर आहे. दरम्यान अशामध्येच शमीने एक नवी कोरी लक्झरी कार खरेदी केली आहे. त्याने खरेदी केलेल्या या कारसोबतचा फोटो व्हायरल होत आहे. ही प्रसिद्ध कंपनी जॅग्वारची एफ-टाइप ( Jaguar F Type) कार असून याची एक्स शो रूम किंमत 98.13 लाख रुपये इतकी आहे.

  


जॅग्वार एफ-टाइप या आलिशान कारची खास गोष्ट म्हणजे ही काही सेंकदात अगदी वेगवान स्पीड घेऊ शकते. ही स्पोर्ट्स कार 3.7 सेकंदात 100 kmph चा वेग पकडू शकते. ही कार टू-सीटर असून 5000 सीसीचं इंजिन या कारमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय कारमध्ये 8 ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देखील बसवण्यात आलं आहे.


नवी दिल्लीमध्ये शमीने खरेदी केली कार


मोहम्मद शमीने ही कार नवी दिल्ली येथील शिवा मोटर्समधून खरेदी केली आहे. शिवा मोटर्सचे डायरेक्टर अमित गर्ग यांनी स्वत: या कारची चावी शमीकडे दिल्याचं दिसून आलं आहे. अमितने यांनीच त्याच्या  लिंकडिन अकाउंटवर शमीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी शमीने त्याच्या सहीचा एक व्हाईट चेंडूही अमित यांना भेट म्हणून दिला आहे. सध्या विश्रांतीवर असलेला मोहम्मद शमी तिनही क्रिकेट प्रकारात उत्तम गोलंदाज आहे. सध्या तो कसोटी सामन्यांमध्ये भारताचा आघाडीचा गोलंदाज आहे. त्याने कसोटीत 216 आणि वनडेमध्ये 152 विकेट्स घेतल्या आहेत.


हे देखील वाचा-