Brian Lara in Indian Dressing room : भारताने वेस्ट इंडीजला (India vs West Indies) एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात 3 धावांनी मात दिली. या सामन्यानंतर वेस्ट इंडीजचा दिग्गज खेळाडू ब्रायन लारा (Brian Lara) थेट भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेला आणि भारतीय खेळाडूंची भेट घेतली. यावेळी लारा खासकरुन शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि श्रेयस अय्यर यांच्याशी चर्चा करताना दिसून आला. तर युजवेंद्र चहलही लारासोबत बराच वेळ असल्याचं दिसून आलं.बीसीसीआयने या बद्दलचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. 


या व्हिडीओमध्ये लारा टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडूंची भेट घेताना दिसून येत आहे. यावेळी कर्णधार शिखर धवन आणि श्रेयस अय्यर हे बराच वेळ लारासोबत गप्पा मारताना दिसून आले. यावेळी इतरही खेळाडू उपस्थित असून लारा सर्वांची भेट घेताना दिसत आहे. लारा याने भारताचा माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविडशी देखील लाराने भेट घेतली. बीसीसीआयने हा फोटो देखील पोस्ट केला आहे.







भारत 3 धावांनी विजयी


नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण दिलं. भारताकडून धवन आणि (97 धावा) आणि गिल (64 धावा) यांनी शतकी भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर गिल धावबाद झाला आणि धवनचंही शतक हुकलं. मात्र, त्यानंतर मैदानात आलेल्या अय्यरनं अर्धशतक झळकावत संघाला चांगल्या स्थितीत आणलं. भारतीय मधल्या फळीला काही खास कामगिरी करता आली नाही. पण अखेरीस दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांच्या जोडीच्या जोरावर भारतानं 300 चा टप्पा पार केला. 309 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजकडून काइल मेयर्सनं सर्वाधिक 75 धावा केल्या. ब्रुक्सनं 46 धावा केल्या. ब्रँडन किंगनं 66 चेंडूत 54 धावा केल्या. तर, कर्णधार निकोलस पूरन 25 धावा करून बाद झाला. अकील हुसेन 33 आणि शेफर्ड यांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचून संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अपयशी ठरले. 


हे देखील वाचा-