Birmingham 2022 Commonwealth Games: बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं (Indian Olympic Association) एकूण 322 सदस्यांची घोषणा केलीय. ज्यात 215 खेळाडू आणि 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश आहे. कामनवेल्थ क्रिडा स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघाचा समावेश केलाय. या स्पर्धेत भारतीय संघ 29 जुलै रोजी ऑस्ट्रेलियाशी पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी भारतीय भारताची माजी महिला कर्णधार अंजूम चोप्रानं (Anjum Chopra) भारतीय महिला संघाला महत्वाचा सल्ला दिलाय. 


अंजुम चोप्रा यांनी काय म्हटलं?
एएनआयशी बोलताना अंजुम चोप्रा यांनी असं म्हटलं की, "बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताच्या गटात ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि बारबाडोस यांचा समावेश आहे. हे सर्व संघ आव्हानात्मक आहेत. टी-20 क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळण्याची पद्धत वेगळी असते. यामुळं कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ नये. सर्वच संघ मजबूत आहेत. कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धेत भारतीय संघात उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. श्रीलंका दौऱ्यात भारतीय महिला संघानं दमदार प्रदर्शन करून दाखवलं. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतानं सर्व सामने जिंकावेत, अशी माझी इच्छा आहे. पण इतकं सोपं नाही. आयसीसी स्पर्धेा कॉमनवेल्थ स्पर्धेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या स्पर्धेत भारताला चांगली कामगिरी करून दाखवायची संधी उपलब्ध झालीय.


कॉमनवेल्थमध्ये भारताचा सुवर्णपदक जिंकण्याचा निर्धार- स्मृती मानधना
"कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय संघ उत्साहित आहेत. जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकतो आणि कानावर देशाचं राष्ट्रगीत पडतं, त्यावेळी काय भावाना असते? हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. यामुळं या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याच्या हेतूनचं आम्ही मैदानात उतरू", असं स्मृती मानधनानं म्हटलं आहे. 


15 खेळांमध्ये सहभागी होतील भारतीय खेळाडू
भारतीय खेळाडू 15 खेळ आणि चार पॅरा स्पोर्ट्समध्ये सहभाग घेणार आहे. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये भारताला आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे. हॉकी आणि महिला क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे 23 जुलै रोजी उघडेल. भारतीय सदस्य येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी असेल.


हे देखील वाचा-