T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात मोहम्मद शामीला भारतीय संघात स्थान मिळणार नाही, आशिष नेहराची भविष्यवाणी
Ashish Nehra on Mohammad Shami: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं अलिकडच्या वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवलीय.
Ashish Nehra on Mohammad Shami: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीनं अलिकडच्या वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करून दाखवलीय. मात्र, गेल्या काही सामन्यांपासून मोहम्मद शामीला भारतीय टी-20 संघात स्थान मिळत नाही. याचदरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरानं मोहम्मद शामीच्या टी-20 विश्वचषक निवडीबद्दल वक्तव्य केलंय. या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात मोहम्मद शामीला संघात स्थान मिळणार नाही, अशीही भविष्यवाणी नेहरानं केलीय. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मोहम्मद शामी आशिष नेहराच्या प्रशिक्षणाखाली गुजरात टायटन्स संघाचा भाग होता.
आशिष नेहरा काय म्हणाला?
क्रिझबझशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला की, "ऑस्ट्रेलिया होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकातच्या प्लॅनमध्ये सध्या मोहम्मद शामीचं नाव नाही. पण शामीच्या क्षमतेबद्दल आपण सगळेच जाणतो. त्यानं यंदाचा टी-20 विश्वचषक खेळला नाही तरी भारतात 2023 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय निवड समिती त्याचा नक्कीच विचार करेल", असंही नेहरानं म्हटलंय.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोहम्मद शामीला संधी मिळण्याची शक्यता
"इंग्लंडविरुद्ध भारताला आपल्या सर्वोत्तम खेळाडूंसह खेळायला आवडेल. शामी नक्कीच त्यापैकी एक आहे. या वर्षी आमच्याकडे जास्त एकदिवसीय सामने नाहीत आणि शामी सध्या आयपीएलनंतर ब्रेकवर आहे. कसोटी सामन्यानंतर भारत त्याला इंग्लंडमध्ये 50 षटकांच्या सामन्यांमध्ये संधी देऊ शकतो. तुम्ही अव्वल संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळाल. इंग्लंडसारख्या संघाविरुद्ध तुम्हाला जिंकायला नक्कीच आवडेल आणि त्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम गोलंदाजांची गरज आहे.या यादीत मी मोहम्मद शामीचा समावेश करेल", असंही मोहम्मद शामीनं म्हटलंय.
मोहम्मद शामीनं शेवटचा टी-20 सामना कधी खेळला?
मोहम्मद शामी सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून, तेथे तो यजमानांविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी तयारी करत आहे. हा पाचवा कसोटी सामना गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आलेल्या कसोटी मालिकेचा भाग आहे. शामीनं 2021 टी-20 विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून शामीला संघात स्थान मिळू शकलं नाही.
हे देखील वाचा-