एक्स्प्लोर

Mithun Manhas BCCI president: बीसीसीआयच्या अध्यक्षपद निवडीतही धक्कातंत्र? शेवटच्या क्षणी मिथुन मनहास यांनी मारली बाजी?

Mithun Manhas BCCI president: बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी भारताचा माजी फिरकीपटून हरभनज सिंग याचे नावही चर्चेत होते. मात्र, मिथुन मनहास यांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली.

Mithun Manhas BCCI president: गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटविश्वात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा सुरु आहे. या पदासाठी अनेक बड्या नावांची चर्चा सुरु होती. मात्र, या शर्यतीत शेवटच्या क्षणी कोणालाही फारशी अपेक्षा नसलेले भारताचे माजी वलयांकित रणजी क्रिकेटपटू मिथुन मनहास (Mithun Manhas) यांनी बाजी मारल्याचे सांगितले जात आहे. मिथुन मनहास यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी (BCCI President) निवड जवळपास निश्चित झाली आहे. दिल्लीत पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मनहास यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. रॉजर बिन्नी (Roger Binny) यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास तीन आठवडे हे पद रिक्त होते. आता 28 सप्टेंबर रोजी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) होणार आहे. या सभेत मिथुन मनहास यांच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली जाऊ शकतात. सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये बीसीसीआयचा प्रचंड प्रभाव आहे. अशा परिस्थितीत मिथुन मनहास यांच्यासारख्या खेळाचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या आणि तरुण व्यक्तीकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद जाणे, हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे मानले जात आहे.

Who is Mithun Manhas: कोण आहेत मिथुन मनहास?

मिथुन मनहास हे रणजी क्रिकेटमधील वलयांकित नाव आहे. मिथुन मनहास यांनी भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले नाहीत. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिथुन मनहास यांचे नाव आदराने घेतले जाते. मिथुन मनहास यांनी 1997 साली दिल्लीच्या रणजी संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यानंतर मिथुन हे दिल्लीच्या रणजी संघाचा अविभाज्य भाग होऊन गेले. 2007,2008 हा मिथुन मनहास यांच्या रणजी कारकीर्दीतील सुवर्णकाळ होता. 2007 मध्ये मिथुन मनहास यांनी दिल्लीच्या संघाला 16 वर्षांनी रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तब्बल दोन दशकांच्या आपल्या कारकीर्दीत मिथुन मनहास यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9714 धावा केल्या. यामध्ये 27 शतक आणि 49 अर्धशतकांचा समावेश होता. नंतरच्या टप्प्यात ते जम्मू-काश्मीरच्या संघाकडूनही क्रिकेट खेळले. 2016 साली त्यांच्या पहिल्या दर्जाच्या क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला होता.

IPL Tournament: आईपीएल आणि प्रशिक्षकपदाची कारकीर्द

मिथुन मनहास हे आयपीएल स्पर्धेतही खेळले होते. त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांचे प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मिथुन मनहास यांनी प्रशिक्षक म्हणून नव्या अध्यायाचा प्रारंभ केला. 2018 साली ते दिल्ली रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले. यानंतर त्यांनी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाच्या प्रशिक्षक टीमचा भाग होते. नुकत्याच झालेल्या आयपीएल हंगामात ते गुजरात टायटन्स संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक होते.

Mithun Manhas: मिथुन मनहास यांच्या निवडीमागे राजकीय समीकरणे

बीसीसीआय आणि राजकीय व्यक्तींचे संबंध हे पूर्वीपासून आहेत. त्यामुळे बीसीसीआयचा अध्यक्ष निवडताना राजकीय समीकरणे जुळणे तितकेच महत्त्वाचे होते. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांसह भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनही मिथुन मनहास यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्याचे समजते. मिथुन मनहास यांच्याकडे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे आल्यास पहिल्यांदाच दिल्ली रणजी क्रिकेट संघातील खेळाडू इतक्या मोठ्या पदावर पोहोचणार आहे. आजघडीला जागतिक क्रिकेटविश्वात बीसीसीआयचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे बीसीसीआयचे अध्यक्षपद हे महत्त्वाचे मानले जाते. मिथुन मनहास हे सध्या जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे प्रशासक आहेत. 

आणखी वाचा

बीसीसीआयचा अध्यक्ष कोण होणार? हरभजन सिंगचं नाव चर्चेत, सौरव गांगुलीही शर्यतीत, 28 तारखेला निवडणूक

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
IND vs NZ 2nd ODI : पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी
पावसाने वाचवली लाज! डकवर्थ-लुईसचा ट्विस्ट अन् न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा अवघ्या 4 धावांनी विजय, मालिकेत 2-0 मुसंडी
IND vs NZ 2nd ODI : रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाच्या 7 विकेट्स पडल्या; पण न्यूझीलंडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, भारताचं नशीब पालटलं! DLS चा मोठा ट्विस्ट
रोहित-विराट फ्लॉप, टीम इंडियाच्या 7 विकेट्स पडल्या; पण न्यूझीलंडमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, भारताचं नशीब पालटलं! DLS चा मोठा ट्विस्ट
IND vs NZ 2ND ODI : भारत आणि न्यूझीलंड सामन्यात राडा! मैदानातच गुरनूर ब्रार आणि डॅरिल मिचेल भिडले, नेमकं काय घडलं?, पाहा VIDEO
भारत आणि न्यूझीलंड सामन्यात राडा! मैदानातच गुरनूर ब्रार आणि डॅरिल मिचेल भिडले, नेमकं काय घडलं?, पाहा VIDEO

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
CJP Protest in Kochi: कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
कोचीमध्ये SIR विरोधात कॉकरोच पार्टीचा मोर्चा, जंतर मंतरसारखे आंदोलन; प्रकाश राज म्हणाले, 'हम लेकर रहेंगे आजादी'
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
भारतात दिवाळी, पाकिस्तानाचं मात्र दिवाळं! चार महिन्यांत पाकला मोठा फटका, आयाता वाढली तर निर्यात कमी झाली 
Mumbai Local Train Fight : चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांची तुफान हाणामारी; एकजण धावत्या ट्रेनमधून फेकला गेला, ज्याने पाहिलं ते सगळे हादरले
Devendra Fadnavis: 'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
'बंटी पाटील, हसन मुश्रीफ आणि कोरेंनी एकत्रित बसून आपापसात निर्णय केला, तर..' सीएम फडणवीसांची 'गोकुळ'वर थेट अन् मोठी प्रतिक्रिया
Embed widget