एक्स्प्लोर

World Cup Final : फायनलमध्ये भारत 65 धावांत ढेर होईल, ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शचा उतावळेपणा

Mitchell Marsh on World Cup Fianl : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यामध्ये रविवारी विश्वचषकाची फायनल रंगणार आहे. या सामन्याबाबत अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आणि भाकित येत आहेत.

Mitchell Marsh on World Cup Fianl : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS Final) यांच्यामध्ये रविवारी विश्वचषकाची फायनल रंगणार आहे. या सामन्याबाबत अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आणि भाकित येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मिचेल मार्श (Mitchell Marsh) याने तर रोहित शर्मा आणि टीम इंडियाला थेट इशाराच दिला आहे. विश्वचषकात भारतीय संघाला फक्त 65 धावांवर ऑलआऊट करु, असे मिचेल मार्श याने म्हटलेय. त्यानंतर मार्शची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दिल्ली कॅप्टिलच्या पॉडकॉस्टमध्ये बोलताना मिचेल मार्श याने एकप्रकारे टीम इंडियाला धमकी दिली आहे. 

65 धावांवर भारत ढेर -

ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात अतिशय खराब झाली होती. भारताकडून त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागाला होता. त्यानंतर आफ्रिकेनेही त्यांची दयनिय अवस्था केली होती. त्यानंतर लंकेचा पराभव करत त्यांनी विजयी सुरुवात केली. साखळी सामन्यात भारताने कांगारुचा पराभव केला होता. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया चाचपडताना दिसला. 213 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिायची पुरती भंबेरी उडाली होती. पॅट कमिन्स अन् मिचेल स्टार्क यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळला होता. या सामन्यात मार्शला खातेही उघडता आले नव्हते. पण भारताविरोधात होणाऱ्या फायनलआधी त्याने हुंकार भरली आहे. 

फायनलआधी मिशेल मार्श (Mitchell Marsh) याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याने थेट फॉर्मात असणाऱ्या टीम इंडियालाच इशारा देत भविष्यवाणी केली आहे.  विश्वचषकात भारतीय संघाला फक्त 65 धावांत ऑलआऊट करु, असे म्हटलेय. त्याचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. 

ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये दोन बाद 450 धावा करणार - मिशेल मार्श

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या फायनलबाबत बोलताना मिचेल मार्श याने मोठा दावा केलाय. तो म्हणाला की, फायनलमध्ये आम्ही भारताचा पराभवा करु. भारताचा पराभव करत आम्ही अजेय राहू, असे मार्श म्हणाला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया दोन विकेटच्या मोबदल्यात 450 धावा करेल. प्रत्युत्तरदाखल टीम इंडिया फक्त 65 धावांत ऑलआऊट होईल. 

मिचेल मार्श याने विश्वचषकात सरासरी कामगिरी केली आहे. त्याने एका शतकाच्या मदतीने 400 पेक्षा जास्त धावा केल्या. सेमीफायनलमध्ये मिचेल मार्श याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला खातेही उघडता आले नाही. तरिही त्याने आत्मविश्वासाने ऑस्ट्रेलिया विश्वचषकावर नाव कोरेल, असे म्हटलेय. 

ऑस्ट्रेलियाची विश्वचषकातील आतापर्यंतची कामगिरी - 

विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया संघाच्या सुरुवातीविषयी बोलायचं झालं, तर त्यांना सलग 2 सामने गमवावे लागले होते. त्यांना भारताने 6 विकेट्सने आणि दक्षिण आफ्रिकेने 134 विकेट्सने पराभूत केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी साखळी फेरीतील 7 आणि 1 उपांत्य सामना असे सलग 8 सामने जिंकले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Embed widget