एक्स्प्लोर

मास्टर ब्लास्टर सचिन म्हणतो, सेमीफायनलसाठी 'या' दोन खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये घ्या

ओल्ड ट्रॅफर्डवर मोहम्मद शमीचा अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे त्याला खेळवावं, अशी भावना सचिनने बोलून दाखवली. विराट कोहली देखील मोहम्मद शमीला खेळवण्यासाठी उत्सुक असेल, असेही सचिन म्हणाला.

लंडन : मास्टर  ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला प्लेईंग इलेव्हन  मध्ये घेण्याची भावना व्यक्त केली आहे. सचिन म्हणाला की, मी शमीला खेळवण्याचे समर्थन करतो. कारण याच मैदानावर शमीने वेस्ट इंडिज विरोधात जबरदस्त कामगिरी केली होती.  ओल्ड ट्रॅफर्डवर मोहम्मद शमीचा अनुभव खूप चांगला आहे. त्यामुळे त्याला खेळवावं, अशी भावना सचिनने बोलून दाखवली. विराट कोहली देखील मोहम्मद शमीला खेळवण्यासाठी उत्सुक असेल, असेही सचिन म्हणाला. सोबतच सचिनने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला देखील अंतिम 11 मध्ये समाविष्ट करावे असा सल्ला दिला आहे. सचिन म्हणाला की, जाडेजा एक चांगला पर्याय आहे. जर दिनेश कार्तिक नंबर सातवर फलंदाजी करू शकतो तर जाडेजा देखील या जागी चांगला पर्याय आहे. मोठ्या सामन्यात आपल्याला एका कव्हरची गरज असते कारण आपण केवळ पाच गोलंदाजांसह खेळत आहोत. यासाठी जाडेजा एक चांगला पर्याय आहे, असे सचिन म्हणाला. गेंदबाजों के साथ खेल रहे हैं.'' सेमीफायनलसाठी प्लेईंग इलेव्हन निवडणे टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. कारण सगळेच खेळाडू उत्तम प्रदर्शन करत असल्याने कुणाला घ्यायचंहा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत मास्टर ब्लास्टरचा हा सल्ला कॅप्टन ऐकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. World Cup 2019 | न्यूझीलंडला धूळ चारुन टीम इंडिया फायनलचं तिकीट मिळवणार? टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी सामन्यात सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. तर न्यूझीलंडनं अकरा गुणांसह टॉप फोरमध्ये आपली जागा निश्चित केली. त्यामुळे आता मॅन्चेस्टरमध्ये हे दोन्ही संघ फायनलच्या तिकिटासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. उपांत्य फेरीत आघाडीची मजबूत फळी आणि प्रभावी आक्रमण ही विराटच्या टीम इंडियाची जमेची बाजू आहे. कर्णधार विराटसह रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने यंदाच्या विश्वचषकात धावांचा रतीब घातला आहे. फलंदाजांच्या या कामगिरीला भारतीय आक्रमणानेही तेवढीच मोलाची साथ दिली आहे. बुमरा, शमी आणि भुवनेश्वर या वेगवान आक्रमणासह यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या मनगटी फिरकीनं प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली आहे. हार्दिकची अष्टपैलू कामगिरीही टीम इंडियासाठी मोलाची ठरली आहे. दुसरीकडे विल्यमसनच्या फौजेनंही सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली आहे. या संघात कर्णधार विल्यमसन, मार्टिन गप्टिल, कॉलीन मन्रो, रॉस टेलरसारख्या अनुभवी शिलेदारांचा समावेश आहे. तर ट्रेन्ट बोल्ट, मॅट हेन्री, जीमी निशाम आणि लॉकी फर्ग्युसन या किवी आक्रमणाने विश्वचषकाच्या मैदानात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतलं न्यूझीलंडचं आव्हान टीम इंडियासाठी नक्कीच सोपं नाही, याची जाणीव विराट आणि भारतीय संघव्यवस्थापनाला आहे. भारत आणि न्यूझीलंड विश्वचषकाच्या इतिहासात आजवर सात वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात चार वेळा न्यूझीलंडने तर तीन वेळा भारताने बाजी मारली आहे. विजय-पराजयाचं हे समीकरण काहीसं न्यूझीलंडच्या बाजूनं झुकलेलं आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडिया हे समीकरण बरोबरीत सोडवून फायनलचं तिकीट मिळवणार? की विल्यमसन आणि कंपनी अंडर 19 विश्वचषकातल्या त्या पराभवाचा वचपा काढणार याचीच आता उत्सुकता आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget