Video: बऱ्याच काळानंतर शाहिद आफ्रिदीआणि गंभीर आमने-सामने, आणि मग...
Legends League Cricket : इंडिया महाराजा आणि आशिया लायन्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात गौतम गंभीरने 54 धावांची शानदार खेळी केली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
Gautam gambhir and shahid afridi : लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC) 2023 सीझनची सुरुवात दोहा येथे 10 मार्चपासून इंडिया महाराजा आणि एशिया लायन्स (india maharaja vs asian lions) यांच्यातील सामन्याने झाली. पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे अनेक माजी दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसले. यादरम्यान असाच एक हटके सीन क्रिकेट चाहत्यांनी पाहिला, ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. इंडिया महाराजा संघाचा कर्णधार गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) डोक्याला फलंदाजीच्या वेळी बाउन्सरचा चेंडू लागला ज्यानंतर आशिया लायन्स संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी तातडीने पोहोचल्याचं दिसून आलं.
दरम्यान जेव्हा इंडिया महाराजाचा संघ आशिया लायन्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत होता, त्यावेळी गौतम गंभीर आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत होता. दरम्यान, अब्दुल रझाकचा एक चेंडू थेट गंभीरच्या डोक्यावर आदळला, त्यावर त्याने एकच धाव घेतली. यानंतर शाहिद आफ्रिदी गंभीरसोबतचे त्याचे जुने वाद विसरुन लगेच जाऊन त्याच्याशी बोलला, त्याची विचारपूस केली. दरम्यान आफ्रिदी आणि गंभीरमधील या संभाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा VIDEO-
'Big-hearted' Shahid Afridi inquires if Gautam Gambhir is ok after that blow ❤️#Cricket pic.twitter.com/EqEodDs52f
— Cricket Pakistan (@cricketpakcompk) March 10, 2023
गंभीरने आपल्या खेळीने सर्वांची मने जिंकली, पण संघ हरला
या सामन्यात (india maharaja vs asian lions) गौतम गंभीरने 39 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी नक्कीच खेळली, पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकला नाही. या सामन्यात आशिया लायन्स संघाने इंडिया महाराजा संघाला 166 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु संघाला 20 षटकात केवळ 156 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात गंभीरने शाहिद आफ्रिदीच्या गोलंदाजीवर केवळ धावा केल्या नाहीत तर तुफानी फलंदाजी करत सर्व चाहत्यांची मनं जिंकली. मात्र, गंभीरला दुसऱ्या टोकाकडून फारशी साथ न मिळाल्याने तो संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकला नाही.
वर्ल्डकप हिरो आहे गौतम गंभीर
2011 विश्वचषकात श्रीलंकेनं दिलेलं 275 धावांचं लक्ष्य भारतीय फलंदाजी क्रम पाहता फारसं मोठं वाटत नव्हतं. परंतु, सलामी देण्यासाठी मैदानात आलेल्या भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवान शून्यावर बाद झाल्यानंतर संघ थोडा अडचणीत सापडला. त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या रुपात भारताला 31 धावांवर दुसरा झटका बसला. सचिन बाद होताच मैदानात शांतता पसरली. त्यावेळी भारताचं पुन्हा विश्वचषक जिंकण्याचा स्वप्न धुसर होतं की काय? असं वाटू लागलं होतं. मात्र, गौतम गंभीरनं (97 धावा) आणि विराट कोहलीनं (35 धावा) संयमी खेळ दाखवत संघाच्या आशा वाढवल्या. त्यानंतर धोनीच्या 91 धावांच्या झंझावाती खेळीनं भारताला विश्वचषक जिंकून दिला.
हे देखील वाचा-